advertisement

Video : आयपीएल स्टार झाला पायलट, सिझन सुरू व्हायच्या आधीच 30 हजार फुटांवरून लँड केलं प्लेन!

Last Updated:

आयपीएल सुरू व्हायच्या आधी दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने थेट कॉकपिट गाठून विमान चालवलं आहे. विमान लँड करतानाचा थरारक व्हिडिओ या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आयपीएल स्टार झाला पायलट, सिझन सुरू व्हायच्या आधीच 30 हजार फुटांवरून लँड केलं प्लेन!
आयपीएल स्टार झाला पायलट, सिझन सुरू व्हायच्या आधीच 30 हजार फुटांवरून लँड केलं प्लेन!
मुंबई : आयपीएल सुरू व्हायच्या आधी दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने थेट कॉकपिट गाठून विमान चालवलं आहे. विमान लँड करतानाचा थरारक व्हिडिओ या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटपटू ग्लेन फिलिप्स हा फक्त ऑलराऊंडरच नाही तर पायलटही आहे. मैदानावर कॅच पकडण्यासाठी सुपरमॅन सारख्या उड्या मारणारा ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडमध्ये विमान उडवत आहे.
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडकडून खेळला. या सामन्यात पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडची टीम त्यांच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर ग्लेन फिलिप्स थेट विमानाच्या कॉकपिटमध्ये गेला आणि त्याने न्यूझीलंडच्या आकाशात विमान उडवलं.
पैशांच्या अभावी पायलट बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही, अशी खंतही फिलिप्सने व्यक्त केली. ग्लेन फिलिप्सने सोशल मीडियावर विमानाचं लँडिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याआधी फिलिप्सने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते, ज्यात तो फ्लाइंग स्कूलचे विद्यार्थी आणि प्रशिक्षकांसोबत चर्चा करताना दिसत होता.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Glenn Phillips (@glennphillips236)



advertisement
'मला हवेमध्ये राहणं खूपच आवडतं. मला डोंगराळ भागात जायची इच्छा आहे, जिथे मला काम करण्याची अजिबात इच्छा नाही. मला माझ्या छंदाचा आनंद घ्यायचा आहे, पण तरीही मला काम करावं लागलं, तर पायलट बनणं ही माझी पहिली पसंत असेल', असं ग्लेन फिलिप्स म्हणाला.

आयपीएलमध्ये खेळणार फिलिप्स

आयपीएल 2026 मध्ये ग्लेन फिलिप्स गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. फिलिप्सला गुजरातने 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. आयपीएल 2023 मध्ये फिलिप्स सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात फिलिप्सला गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Video : आयपीएल स्टार झाला पायलट, सिझन सुरू व्हायच्या आधीच 30 हजार फुटांवरून लँड केलं प्लेन!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement