T20 World Cup साठी टीमची घोषणा, रोहितच्या खास मित्राला मिळाली कॅप्टन्सी; शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिरवणाऱ्या खेळाडूची एन्ट्री!

Last Updated:

New Zealand T20 World Cup 2026 Squad : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी 7 जानेवारी रोजी आपल्या अधिकृत स्क्वाडची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व फिरकीपटू मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आलं आहे.

New Zealand T20 World Cup 2026 Squad
New Zealand T20 World Cup 2026 Squad
T20 World Cup 2026 : आगामी फेब्रुवारी महिन्यात रंगणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभासाठी सर्वच संघांनी कंबर कसली असून, अनेक देशांनी आपले शिलेदार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. श्रीलंका आणि भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये आतापासूनच कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या जागतिक स्पर्धेचे बिगुल वाजले असून, विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या एका संघाने आपला 15 सदस्यीय ताफा मैदानात उतरवण्यासाठी सज्ज केला आहे.

स्फोटक ओपनरचं पुनरागमन

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी 7 जानेवारी रोजी आपल्या अधिकृत स्क्वाडची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व फिरकीपटू मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आलं आहे, जो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. या संघात फिन ॲलेनसारख्या स्फोटक ओपनरचं पुनरागमन झालं असून, त्याने यापूर्वीअवघ्या 34 बॉलमध्ये शतक झळकावत 19 सिक्स मारण्याचा जागतिक रेकॉर्ड केला होता. टीम इंडियाविरुद्धच्या 5 मॅचच्या टी-ट्वेंटी सीरीजनंतर न्यूझीलंड आपला वर्ल्ड कप प्रवास सुरू करेल.
advertisement

न्यूझीलंडचे सामने कधी?

ग्रुप D मध्ये स्थान मिळालेला न्यूझीलंडचा संघ 8 फेब्रुवारी रोजी चेन्नईत अफगाणिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. यानंतर 10 फेब्रुवारीला यूएई, 14 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका आणि 17 फेब्रुवारीला कॅनडाविरुद्ध न्यूझीलंडचा सामना होतील. सध्या संघातील लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री आणि स्वतः सँटनर हे काही खेळाडू दुखापतींशी झुंज देत असले, तरी बोर्डाने ते स्पर्धेपूर्वी पूर्णपणे फिट होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
advertisement
न्यूझीलंडचा पूर्ण स्क्वाड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलेन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉन्वे, जॅकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, ॲडम मिल्ने, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सीफर्ट, ईश सोढी.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup साठी टीमची घोषणा, रोहितच्या खास मित्राला मिळाली कॅप्टन्सी; शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिरवणाऱ्या खेळाडूची एन्ट्री!
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement