VIDEO : ग्लोव्हज फेकले, पॅड फेकून मारला,ड्रेसिंग रूममध्ये भयंकर ड्रामा,पुरन इतका का चिडला?

Last Updated:

सनरायझर्स हैदराबाबसमोर 206 धावांचे आव्हान आहे. दरम्यान लखनऊच्या फलंदाजी दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये पुरन प्रचंड चिडलेला दिसला.त्याने ड्रेसिंग रूममध्ये येऊन मोठा राडा केला.

Nicholas pooran Loses cool
Nicholas pooran Loses cool
Nicholas pooran Loses cool : आयपीएलमध्ये आज लखनऊ सूपर जाएट्सने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 205 धावा केल्या आहेत. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाबसमोर 206 धावांचे आव्हान आहे. दरम्यान लखनऊच्या फलंदाजी दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये पुरन प्रचंड चिडलेला दिसला.त्याने ड्रेसिंग रूममध्ये येऊन मोठा राडा केला.
आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सामना सूरू आहे. या सामन्याचा टॉस सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लखनऊ सूपर जाएंट्स प्रथम फलंदाजीला उतरली आहे.
advertisement
लखनऊच्या डावाच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली. 26 बॉलमध्ये 45 धावा काढणारा पूरन तिसऱ्याच बॉलवर स्ट्राईक रिटेन करण्याचा प्रयत्न करत असताना नाट्यमय पद्धतीने धावबाद झाला.खरं तर शेवटच्या तीन
बॉल खेळण्याच्या नादात तो आऊट झाला. खरं तर हा धोका पत्करल्यानेच तोच रनआऊट झाला.त्यानंतर तो प्रचंड निराश झाला होता.
बाद झाल्यानंतर स्पष्टपणे निराश झालेला पूरन डगआउटमध्ये परतला आणि ड्रेसिंग रूमच्या परिसरात रागाने हातमोजे फेकताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर ड्रेसिंग रूमच्या आत गेल्यानंतर संघाचे एकामागून एक पडल्यानंतर त्याने काचेवर पॅड फेकून मारला होता. त्यामुळे पुरनने संयम गमावला होता. या संदर्भातला आता व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
advertisement
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई, दिग्वेश सिंग राठी, विल्यम ओरूरके
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन (w), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, हर्ष दुबे, झीशान अन्सारी, एशान मलिंगा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : ग्लोव्हज फेकले, पॅड फेकून मारला,ड्रेसिंग रूममध्ये भयंकर ड्रामा,पुरन इतका का चिडला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement