IND vs ENG : 23 वर्षानंतर इतिहास रचला, पण Nitish Kumar Reddy ने केलं रोहितच्या दुष्मनाचं कौतुक, म्हणाला 'मा‍झ्या कॅप्टनने मला...'

Last Updated:

Nitish Kumar Reddy On Pat Cummins : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसानंतर नितीश कुमार रेड्डी प्रेस कॉन्फरन्सला सामोरं गेला. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचं कौतुक केलं.

Nitish Kumar Reddy On Pat Cummins
Nitish Kumar Reddy On Pat Cummins
IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूट (Joe Root) याच्या अफलातून 99 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने पहिल्या दिवशी 251 धावा उभा केल्या आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी इंग्लंडच्या बेझबॉलची हवा काढली. टीम इंडियाने चार विकेट्स घेतल्या अन् इंग्लंडवर दबाव निर्माण केला. यामध्ये नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याने एकाच ओव्हरमध्ये दोन महत्त्वाचे विकेट घेतले. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना नितीश रेड्डीने घरचा रस्ता दाखवला होता. झॅक क्रॉली आणि बेन डकेट या दोघांना नितीशने तंबूत पाठवलं. त्याचबरोबर नितीश कुमार रेड्डीने 23 वर्षानंतर एक रेकॉर्ड रचला आहे. अशातच नितीश कुमार रेड्डी पहिल्या दिवसानंतर प्रेस कॉन्फरन्सला (Nitish Kumar Reddy Press Conference) सामोरं गेला.

काय म्हणाला नितीश कुमार रेड्डी?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मी चांगली बॅटिंग तर केली पण बॉलिंगवर काम करण्याची गरज आहे, असं मला जाणवलं. त्यानंतर मी माझा कॅप्टन (SRH साठी) राहिलेल्या पॅट कमिन्ससोबत चर्चा केली. ऑस्ट्रेलियाच्या पीचवर मी काय सुधारणा करु शकतो, यावर मी त्याला विचारणा केली. त्यानंतर पॅट कमिन्सने मला काही सल्ला दिले. त्याचा मला फायदा झाला. माझी बॉलिंग सुधारली, असं देखील नितीश कुमार रेड्डी याने म्हटलं आहे.
advertisement

आम्ही बॉलिंगवर काम करतोय - नितीश रेड्डी

नितीश कुमार रेड्डी याने यावेळी टीम इंडियाच्या बॉलिंग कोचचे देखील आभार मानले. इंग्लंड दौऱ्याआधी मॉर्ने मॉर्कल याने दिलेल्या टीप्स कामी आल्या. इथं आल्यापासून आम्ही बॉलिंगवर काम करत आहोत. त्याचा फायदा मला विकेट्स घेण्यात आला, असंही नितीश कुमार रेड्डी याने म्हटलं आहे.
advertisement
advertisement

23 वर्षात दुसऱ्यांदा असं घडलं

तब्बल 23 वर्षात दुसऱ्यांदा एखाद्या भारतीय वेगवान बॉलरने सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये दोन किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी 2006 मध्ये इरफान पठाणने कराची येथे पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला होता. इरफानने दोन नव्हे तर हॅट्रिक पूर्ण केली होती. यावेळी नितीश कुमार रेड्डी यांनी 2 विकेट्स नावावर केल्या आहेत.
advertisement

कसोटीमधील कामगिरी

दरम्यान, नितीश कुमार रेड्डीने 22 नोव्हेंबर 2024 रोजी पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2024-25 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. जुलै 2025 पर्यंत, त्याने 6 कसोटी मॅच खेळल्या आहेत. यामधील आत्तापर्यंतची त्याची सर्वोत्तम कामगिरी ही लॉर्ड्सवर चालु असलेल्या सामन्यात आहे. त्यामुळे आता ऑलराऊंडर म्हणून नितीश कुमार रेड्डी याला अधिक चांगली कामगिरी करावी लागेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : 23 वर्षानंतर इतिहास रचला, पण Nitish Kumar Reddy ने केलं रोहितच्या दुष्मनाचं कौतुक, म्हणाला 'मा‍झ्या कॅप्टनने मला...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement