रिटायर नाही झाले रोहित-विराट... वादाची ठिणगी पडताच ICC बॅकफूटवर, काही तासात सुधारली चूक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रिकेटच्या ताज्या क्रमवारीमुळे मोठा वाद निर्माण झाला, अखेर आयसीसीला या वादावर स्पष्टीकरण देत त्यांची चूक सुधारावी लागली आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रिकेटच्या ताज्या क्रमवारीमुळे मोठा वाद निर्माण झाला, अखेर आयसीसीला या वादावर स्पष्टीकरण देत त्यांची चूक सुधारावी लागली आहे. टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आयसीसीने वनडे क्रिकेटच्या बॅटरच्या टॉप-100 क्रमवारीमधून वगळण्यात आलं होतं. मागच्या आठवड्यापर्यंत विराट आणि रोहित यांचा समावेश वनडे क्रमवारीमध्ये टॉप-5 मध्ये होता, मग अचानक दोघांची नाव क्रमवारीमधून गायब कशी झाली? असा प्रश्न चाहत्यांना पडला. आयसीसीच्या या चुकीमुळे सोशल मीडियावर वाद वाढला. तसंच अनेकांनी रोहित आणि विराट वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त झाले का? असा सवाल विचारायला सुरूवात केली.
आयसीसीने सुधारली चूक
ICC च्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने निवृत्ती घेतली असेल किंवा गेल्या 9-12 महिन्यांमध्ये एकही वनडे मॅच खेळली नसेल तरच त्याला वनडे क्रमवारीत स्थान मिळत नाही. हा नियम रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना लागू होत नाही, कारण ते भारताच्या वनडे टीमचे नियमित सदस्य आहेत. तरीही, त्यांच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. रोहित शर्मा आणि विराट वनडेमधूनही निवृत्त होतील, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या, त्यातच दोघांचीही नावं क्रमवारीमधूनही गायब झाल्यामुळे, या चर्चा आणखी वाढल्या.
advertisement
ही संपूर्ण घटना ICC कडून झालेली तांत्रिक चूक होती. ICC ने लगेच चूक मान्य केली आणि ती दुरुस्त केली. आता ताज्या अपडेटनंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे क्रमवारीत परतले आहेत. आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झालेल्या नवीन क्रमवारीत, रोहित शर्मा बॅटरच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे आणि विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. गेल्या आठवड्यातही हे दोन्ही खेळाडू याच स्थानावर होते, ज्यामुळे त्यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.
advertisement
ऑस्ट्रेलियामध्ये खेळणार रोहित-विराट
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अलीकडेच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यापूर्वी, दोघांनी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे, आता हे दोन्ही खेळाडू फक्त वनडे क्रिकेटच खेळणार आहेत. टीम इंडियाला या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे, जिथे वनडे सीरिज खेळली जाईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या सीरिजमधून पुन्हा एकदा मैदानात दिसण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 20, 2025 9:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रिटायर नाही झाले रोहित-विराट... वादाची ठिणगी पडताच ICC बॅकफूटवर, काही तासात सुधारली चूक!