IND vs SA : ना रोहित शर्मा ना ऋषभ पंत, शुभमन गिलच्या जागेवर कोण करणार साऊथ अफ्रिकाविरुद्ध ODI कॅप्टन्सी?

Last Updated:

India vs South Africa ODI Series : टीम इंडियाच्या वनडे फॉरमॅटचा कॅप्टन शुभमन गिल आणि व्हाईस कॅप्टन श्रेयस अय्यर दोघंही दुखापतग्रस्त असल्याने आता साऊथ अफ्रिकाविरुद्ध कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय.

India ODI Captain vs South Africa
India ODI Captain vs South Africa
IND vs SA ODI Series : येत्या 30 नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिका सुरू होत आहे, मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार शुभमन गिल याला कोलकाता येथे झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान मानेला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले असून, तो आगामी वनडे मालिकेला मुकणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. गिलने पहिल्या डावात फक्त 3 बॉल खेळले होते, त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. दुसरीकडे, श्रेयस अय्यर हा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने निवड समितीसमोर पेच निर्माण झाला होता.

कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्व?

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व केएल. राहुलकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्या गैरहजेरीत राहुलला 'कॅप्टन' म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. राहुलने यापूर्वीही भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, त्याची वनडे आकडेवारी देखील प्रभावी आहे.
advertisement

वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन

केएल राहुलने आतापर्यंत 88 सामन्यांत 48.31 च्या सरासरीने 3092 रन्स केले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कठीण दौऱ्यात राहुलचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे, कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे या मालिकेद्वारे वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन होत आहे.
advertisement

कसं असेल सिरीजचं वेळापत्रक?

दरम्यान, साऊथ अफ्रिकाविरुद्धची वनडे मालिका 30 नोव्हेंबरला रांची येथे पहिल्या सामन्याने सुरू होईल, त्यानंतर 3 डिसेंबरला रायपूर आणि 6 डिसेंबरला विझाग येथे सामने खेळवले जातील. घरच्या मैदानावर होणारी ही मॅच आणि दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन यामुळे ही मालिका रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : ना रोहित शर्मा ना ऋषभ पंत, शुभमन गिलच्या जागेवर कोण करणार साऊथ अफ्रिकाविरुद्ध ODI कॅप्टन्सी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement