MI vs DC सामन्यात नवा राडा, अंपायरचा एक निर्णय अन् विप्राज ठरला बळी; 7.5 ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
IPL 2025 : आयपीएलची पुन्हा एकदा दमदार सुरुवात झाली असून बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघात मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे मैदानात आयपीएलचा 63 वा सामना खेळाला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारत दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धूळ चारली.
IPL 2025 : आयपीएलची पुन्हा एकदा दमदार सुरुवात झाली असून बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघात मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे मैदानात आयपीएलचा 63 वा सामना खेळाला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारत दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धूळ चारली. प्लेऑफची चुरस रंगली असतानाच या सामन्यात असं काही घडलं ज्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर वाद पेटला आहे.
मुंबईने मारली बाजी
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली आणि दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई इंडियन्सने फलंदाजी करत 180 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 120/10 विकेट गमावत या सामन्यात पराभव पत्करला आणि या विजयासह मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफचा मार्ग मोकळा झाला.
advertisement
सोशल मीडियावर पेटला वाद
मुंबई इंडियन्सने फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्स समोर 180 धावांच लक्ष उभं केलं. या लक्षाचा पाठलाग करण्यात दिल्ली कॅपिटल्सला अपयश आलं आणि हा सामना मुंबई इंडियन्सच्या खात्यात गेला. पण या सामन्यात असं काही घडलं ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं. 7 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विप्राजची विकेट मुंबईच्या मिचेल सँटनरने घेतली. पण यात घडलं असं की हा बॉल बॉलर साइड नो बॉल होता तरीही अंपायरने विप्राजना बाद घोषित केले आणि या नंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचा वाद पेटला.
advertisement
1. It was a clear six by Vipraj but the umpire didn't even bother to check and gave it a four.
2. Santer bowled a side no ball in which Vipraj got out but umpire didn't bother to check.
3. Abhishek Porel was clearly not out
Umpire Indians at their best!! pic.twitter.com/eKNvRsfkLt
— Sohel. (@SohelVkf) May 21, 2025
advertisement
या पूर्वीही अनेकवेळा मुंबई इंडियन्सवर असे आरोप करण्यात आले असून मुंबई इंडियन्सने नेहमीच त्यांच्या खेळाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या ओव्हरमध्ये चूक नेमकी कोणाची होती हे अद्यापही स्पष्ट झालं नसून, सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 22, 2025 8:37 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs DC सामन्यात नवा राडा, अंपायरचा एक निर्णय अन् विप्राज ठरला बळी; 7.5 ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?