advertisement

PAK vs NAM : भारताविरूद्ध पराभवानंतरही पाकिस्तानला अक्कल आली नाही, नामिबिया विरुद्ध तीच चूक केली

Last Updated:

पाकिस्तानने जरी हा सामना जिंकत असली तर त्यांनी सामन्यात मोठी चूक केली आहे. विशेष म्हणजे कॅप्टन सलमान अली आघाने हीच चूक भारताविरूद्ध केली होती.त्यामुळे भारताविरूद्ध पराभव होऊनही पाकिस्तानला अक्कल आली नाही, असे बोलले जात आहे.

pak defeat nam
pak defeat nam
Pakistan defeat Namibia reach Super 8  : पाकिस्तानचा ग्रुप स्टेजमधल्या शेवटच्या सामन्यात
नामिबियाचा पराभव केला आहे. या सामन्यात पाकिस्तानने नामिबियासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबिया 97 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना 102 धावांनी जिंकला आहे. या विजयासह पाकिस्तान सूपर 8 मध्ये पोहोचली आहे. पाकिस्तानने जरी हा सामना जिंकला असला तरी त्यांनी सामन्यात मोठी चूक केली आहे. विशेष म्हणजे कॅप्टन सलमान अली आघाने हीच चूक भारताविरूद्ध केली होती.त्यामुळे भारताविरूद्ध पराभव होऊनही पाकिस्तानला अक्कल आली नाही, असे बोलले जात आहे.
advertisement
खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याआधी स्पिनर गोलंदाज उस्मान तारीकची प्रचंड चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे सलमान आघाने उस्मान तारीक ट्रम्पकार्डही म्हटलं होतं.आणि भारताला याच एका खेळाडूचा मोठा धोका वाटत होता. कारण त्याच्या पॉज गोलंदाजी शैलीमुळे सगळे दहशतीत होते. त्यामुळे त्याची गोलंदाजी सामन्याचा टर्निग पॉइंट ठरेल असे बोलले जात होते. पण सामन्यात भलतच घडलं.
advertisement
सामन्यात अभिषेकचा विकेट पडल्यानंतर ईशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत भारताचा डाव 9 ओव्हमध्ये 88 पार नेला होता. या धावांपैकी 77 धावा त्याच्या एकट्याच्या होत्या. या धावा त्याने 40 बॉलमध्ये खेळत होत्या. यावेळी ईशान किशन पाकिस्तानची इतकी धुलाई करत असताना सलमान आघाने त्याचा ट्रम्प कार्ड वापरलाच नाही. ईशान किशन आपली मॅच विनिंग खेळी केल्यानंतर त्याने उस्मान तारीकला गोलंदाजीला बोलावले होते.त्यामुळे सलमान आगाच्या या निर्णय़ावरून त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. सलमान आगाची ही चूक पराभवाला कारणीभूत ठरली होती.
advertisement
दरम्यान नामिबिया विरूद्ध देथील सलमान आगाने उस्मान तारीकला पहिल्या 10 ओव्हरला गोलंदाजीच दिली नाही. त्यामुळे भारताविरूद्ध झालेल्या पराभवातून पाकिस्तान काहीच शिकली नाही, असे बोलले जात आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानने नामिबियासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबिया 97 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना 102 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना जिंकून सूपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानकडून उस्मान तारीक आणि शादाब खानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत. तर सलमान मिर्झा आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
advertisement
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानच्या नाबाद 100 धावांच्या आणि शादाब खानच्या 36 धावांच्या बळावर त्यांनी 199 धावांपर्यंत मजल मारली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs NAM : भारताविरूद्ध पराभवानंतरही पाकिस्तानला अक्कल आली नाही, नामिबिया विरुद्ध तीच चूक केली
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement