advertisement

AI व्हॉइस स्कॅमने बँक अकाउंट होतंय रिकामं! तुमच्या आई-बाबांना करा अलर्ट

Last Updated:

AI व्हॉइस क्लोनिंग स्कॅम भारतात वेगाने वाढत आहे. स्कॅमर्स कुटुंबातील आवाज क्लोन करुन इमरर्जेंसीची भिती दाखवून पैशांना चुना लावत आहेत. जाणून घ्या कसं काम करतं हे फ्रॉड आणि बचावाच्या आवश्यक सेफ्टी टिप्स कोणत्या...

एआय व्हॉइस क्लोनिंग स्कॅम
एआय व्हॉइस क्लोनिंग स्कॅम
नवी दिल्ली : सध्या ऑनलाइन स्कॅम मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्कॅमर्स विविध पद्धती वापरुन फसवणूक करत आहेत. दिल्लीत राहणाऱ्या 65 वर्षांच्या राधा देवी यांना एकदा संध्याकाळी अचानक फोन आला. आवाज त्यांच्या मुलीचा वाटत होतो. ती रडत म्हणत होती की, 'आई मी अडचणीत आहे... मला किडनॅप केलंय. पापांना सांग की, पैसे पाठव, अन्यथा...' हे ऐकताच राधा टेन्शनमध्ये आल्या. स्कॅमर्सने सोशल मीडियावरुन काही सेकंड्सचा ऑडियो घेऊन AI वरुन त्यांच्या लेकीचा आवाज क्लोन केला होता. आवाज ऐकताच न विचार करता राधा यांनी UPI वरुन 2 लाख रुपये ट्रान्सफर केले.
नंतर, मुलगी घरी सुरक्षित असल्याचे दिसून आले. ही फक्त एक गोष्ट नाही तर भारतात वेगाने पसरणाऱ्या AI व्हॉइस क्लोनिंग घोटाळ्याची वास्तविकता आहे, जिथे घोटाळेबाज कुटुंबांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांच्या आवाजाचा वापर करतात.
AI Voice Cloning म्हणजे काय?
एआय व्हॉइस क्लोनिंग कसे काम करते? स्कॅमर फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपवरून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे व्हिडिओ/ऑडिओ चोरतात. प्रगत एआय टूल्स वापरून, ते फक्त 3-5 सेकंदात तुमचा आवाज क्लोन करतात. नंतर, ते एका अनोळखी नंबरवरून कॉल करतात आणि "अपघात," "अपहरण," किंवा "तुरुंगात" सारख्या कथा रचतात. भारतात असे घोटाळे झपाट्याने वाढत आहेत. सायबर क्राईम रिपोर्ट्स 2025 मध्ये एआय फसवणुकीत 40% वाढ दर्शवतात.
advertisement
यामध्ये महिला आणि वयस्कर लोकांना सर्वात जास्त टार्गेट केले जाते. कारण ते इमोशनली वल्नरेबल आहेत. US मध्येही, 60+ वयाच्या लोकांनी 2024 मध्ये अशा स्कॅम्सने $4.9 बिलियन गमावले आहेत. भारतातही वयस्कर महिलांच्या केस वाढल्या आहेत. फ्लोरिडाच्या एका मदरने AI क्लोन व्हाइस स्कॅममुळे $15,000 गमावले आहेत.
advertisement
FBIने इशारा दिला आहे की, AI स्कॅम्सची "विश्वसनीयता" वाढली आहे. म्हणूनच, स्वतःचे आणि एकमेकांचे संरक्षण करण्यासाठी आपण विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
महिला आणि वयस्करांसाठी सेफ्टी गाइड : 
सर्वात आधी, फॅमिली कोड वर्ड बनवा : एक सीक्रेट शब्द जो फक्त कुटुंबातील लोकांना माहिती असेल. संशयित कॉलवर विचारा, उत्तर चुकीचं असेल तर हे स्कॅम आहे.
advertisement
म्हणजे कॉलरला व्हेरिफाय करा : कॉल कट करुन आपल्या लोकांच्या खऱ्या नंबरवर कॉल बॅक करा. अनोळखी नंबवरुन आलेल्या इमरजेन्सीवर कधीच पैसे पाठवू नका.
AI डिटेक्ट करा : विचित्र प्रश्न विचारा जसं की, 'आपण रात्री काय खाल्ल होतं?' उत्तर चुकीचं वाटलं तर अलर्ट व्हा.
advertisement
म्हणजे सोशल मीडिया प्रायव्हसी : व्हॉइस क्लिप्स पब्लिकमध्ये शेअर करु नका. प्रोफाइल प्रायव्हेट ठेवा.
कधीही फोनवर बँक डिटेल्स शेअर करू नका : तुमचा UPI पिन, OTP किंवा CVV शेअर करू नका. तुमची फसवणूक झाली असेल तर ताबडतोब पोलिस किंवा सायबर सेल (1930) ला कळवा. McAfee किंवा Truecaller सारख्या अॅप्सचा वापर करा, जे AI डिटेक्ट शोधतात.
advertisement
हे स्कॅम फक्त पैसे चोरत नाही, तर मेंटल हेल्थवर परिणाम करतात. महला आणि वयस्कर घरात ऐकटे राहतात. यामुळे फॅमिली सपोर्ट आवश्यक आहे. जागरुकता केल्यास बचाव होऊ शकतो. कारण एआय जेवढा स्मार्ट आहे, तेवढंच आपण सावधान राहणं गरजेचं आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
AI व्हॉइस स्कॅमने बँक अकाउंट होतंय रिकामं! तुमच्या आई-बाबांना करा अलर्ट
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement