PAK vs BAN : फायनलमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तानच्या कॅप्टनची टीम इंडियाला वॉर्निंग, Salman Ali Agha म्हणतो 'रविवारी आम्ही...'

Last Updated:

Asia Cup Final, IND vs PAK : आम्ही जर अशा मॅचेस जिंकत असाल, तर आम्ही एक 'स्पेशल टीम' असलो पाहिजे, असं म्हणत सलमान अली आगा याने स्वत:च्या टीमचं कौतूक केलंय.

Salman Ali Agha React On Ind vs Pak asia cup final
Salman Ali Agha React On Ind vs Pak asia cup final
Salman Ali Agha Statement : तब्बल 41 वर्षानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तान आशिया कपच्या फायनलमध्ये आमने सामने येणार आहे. आशिया कप 2024 च्या सुपर 4 स्टेजमध्ये बांगलादेशवर रोमांचक विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आघाने संघाचे जोरदार कौतुक केलं. मॅच संपल्यानंतर बोलताना सलमान आगाने टीमला 'स्पेशल टीम' (Special Team) असं म्हटलं, तसेच बॉलिंग (Pakistan Bowling) युनिटचं विशेष अभिनंदन देखील केलं आहे. त्यावेळी त्याने जाता जाता टीम इंडियाला वॉर्निंग देखील दिलीये.

बॅटिंगमध्ये सुधारणेची गरज पण...

सलमान अली आगा म्हणाला, तुम्ही जर अशा मॅचेस जिंकत असाल, तर आम्ही एक 'स्पेशल टीम' (Special Team) असलो पाहिजे. सगळ्यांनी खूप चांगले प्रदर्शन केलं. त्याने बॅटिंगमध्ये सुधारणेची गरज असल्याचे मान्य केले. बॅटिंगमध्ये थोडी सुधारणा करणं आवश्यक आहे, पण आम्ही त्यावर नक्कीच काम करू, असं देखील सलमान अलीने म्हटलं आहे.
advertisement

...तर बऱ्याचदा मॅच जिंकू शकतो

बॉलिंग युनिटचे कौतुक करताना तो म्हणाला, आम्ही 15 रन्स कमी केल्या होत्या. पण, आम्ही ज्या प्रकारे सुरुवातीला बॉलिंग केली, त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर दबाव तयार झाला. आम्ही नवीन बॉलने चांगली बॉलिंग केली आणि तुम्ही जर अशी बॉलिंग केली, तर बऱ्याचदा मॅच जिंकू शकतो, असा विश्वास देखील त्याने यावेळी व्यक्त केला. त्यानंतर त्याने टीम इंडियाला वॉर्निंग दिली.
advertisement

तुम्ही जर चांगली फील्डिंग करू शकत नसाल तर....

शाहीन एक 'स्पेशल प्लेयर' आहे. टीमला त्याच्याकडून जी अपेक्षा आहे, तेच तो करतो. त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे. आमची फील्डिंग चांगली होत आहे. शेन आमच्यावर खूप मेहनत घेत आहे. आम्ही एक्स्ट्रा सेशन्स करत आहोत. हेड कोच माईक हेसन यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्ही जर चांगली फील्डिंग करू शकत नसाल तर तुम्ही टीममध्ये नसाल, ज्यामुळे आमच्या फील्डिंगमध्ये सुधारणा झाली आहे, असंही सलमान म्हणाला.
advertisement

आम्ही रविवारी परत येऊ - सलमान अली

दरम्यान, प्रतिस्पर्धी टीम इंडियाला इशारा देत सलमान म्हणाला की, "आम्ही कोणलाही हरवण्याइतकी चांगले टीम आहोत. आम्ही रविवारी परत येऊ आणि तेच करण्याचा प्रयत्न करू, असं म्हणत सलमानने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये मस्त जोक मारला आहे. पाकिस्तानला फक्त 11 रन्सने विजय मिळवता आला आहे. त्यावरच पाकिस्तान मोठ्या उड्या मारताना दिसतंय. त्यामुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये हसमुख वातावरण पहायला मिळतंय.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : फायनलमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तानच्या कॅप्टनची टीम इंडियाला वॉर्निंग, Salman Ali Agha म्हणतो 'रविवारी आम्ही...'
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement