VIDEO : रबाडाचा तो खतरनाक SIX, शाहीन आफ्रिदीचा चेहराच पडला, नंतर फलंदाज हसत सुटला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रबाडाने पाकिस्तानचा मेन बॉलर आणि कर्णधार शाहिन आफ्रिदीला गगनचुंबी षटकार मारला होता. हा षटकार पाहताच आफ्रिदीचा चेहराच पडला होता.या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Kagiso Rabada Hits Shaheen Afridi Six Video : पाकिस्तान आणि साऊत आफ्रिकेत संध्या दुसरा टेस्ट सामना सूरू आहे.हा सामना रोमांचक स्थितीत सूरू आहे. या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने 61 बॉलमध्ये 71 धावांची वादळी खेळी करून सर्वांना आश्चर्यचकीत केले होते.या खेळीदरम्यान त्याने त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले होते. रबाडाच्या या खेळी दरम्यान एक मजेशीर घटना देखील घडली होती. रबाडाने पाकिस्तानचा मेन बॉलर शाहिन आफ्रिदीला गगनचुंबी षटकार मारला होता. हा षटकार पाहताच आफ्रिदीचा चेहराच पडला होता.या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
खरं तर ही घटना 107 व्या ओव्हर दरम्यान घडली होती.त्यावेळी पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी गोलंदाजीला आला होता. यावेळी रबाडाने पहिल्याच बॉलवर दोन धावा काढल्या.यानंतर दोन्ही बॉल त्याने डॉट केले. चौथ्या बॉलवर थेट रबाडाने समोरच्या दिशेने जबरदस्त सिक्स खेचला. हा सिक्स पाहून शाहिन आफ्रिदीचा चेहराच उतरला होता. रबाडाला देखील यावर विश्वास बसला नव्हता त्यामुळे तो हसत सुटला होता. या संदर्भातला व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
advertisement
Rabada Six against Shaheen.#PAKvSA #Rabada pic.twitter.com/7pMMq3V7Nu
— GAURAV (@crazyGaurav_) October 22, 2025
यासोबत पाचव्या बॉलवर रबाडाने खणखणीत चौकार खेचला.त्यानंतर सहावा बॉल डॉट केला. अशाप्रकारे आफ्रिदिच्या ओव्हरमध्ये त्याने 12 धावा काढल्या.
advertisement
रबाडा मुथूसामीने अख्खी मॅच फिरवली
पाकिस्तानचा पहिला डाव हा 333 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या पहिल्या डावाची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि टोनी डे झोर्सीने आफ्रिकेचा डाव सावरला होता.स्टब्सने 76 आणि टोनीने 55 धावांची अर्धशतकीय खेळी करून हे दोघेही आऊट झाले होते. या दोन खेळाडूंच्या विकेटनंतर आफ्रिकेचा डाव गडगडला आणि झटपट विकेट पडले.
advertisement
आफ्रिकेचे 235 धावांवर 8 विकेट पडले होते. आता इथून जास्तीत जास्त आफ्रिका 250 धावापर्यंत मजल मारून ऑलआऊट झाली असती असे वाटत होते.पण मैदानावर असलेल्या केशव महाराज आणि सेनुरन मुथूसामी टीचून फलंदाजी करत आफ्रिकेचा डाव 300 पार नेला होता. या दरम्यान केशव महाराज 30 धावांवर बाद झाला. महाराज बाद झाल्यानंतर रबाडा मैदानात आला होता. आता इथून जास्तीत जास्त 10 -12 धावा करून आफ्रिका ऑलआऊट झाली असत. पण रबाडाने उत्कृष्ट खेळी.
advertisement
रबाडाने यावेळी 61 बॉलमध्ये 71 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर त्याच्या सोबत मैदानावर असलेला सेनुरन मुथूसामी 89वर नाबाद राहिला.अशाप्रकारे साऊथ आफ्रिकेचा डाव 404 धावांवर ऑल आऊट झाला.यामुळे पहिल्या डावात 71 धावांची आघाडी घेतली होती.
advertisement
पाकिस्तानची दुसऱ्या डावात आता खराब सुरूवात झाली आहे.कारण 94 डावात 4 विकेट पडले आहेत.सध्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान फलंदाजी करतायत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 6:29 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : रबाडाचा तो खतरनाक SIX, शाहीन आफ्रिदीचा चेहराच पडला, नंतर फलंदाज हसत सुटला