Pakistan Cricket : मोहम्मद रिझवानची कॅप्टन्सीवरून हकालपट्टी, पाकिस्तान संघाला मिळाला नवा कॅप्टन, 'प्राईम' घोड्यावर लावला डाव!

Last Updated:

Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहिन शाह आफ्रिदी याला कॅप्टन बनवण्याचं कोणतंही ठोस कारण दिलं नाही किंवा रिजवान यांना हटवण्याचंही कारण स्पष्ट केलं नाही.

Pakistan Cricket Board Appointed New ODI Captain
Pakistan Cricket Board Appointed New ODI Captain
Pakistan New ODI Captain : आशिया कपमध्ये भारताकडून तीन वेळा मात खाल्यानंतर आता पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली होती. अशातच क्रिकेट बोर्डाने पुन्हा कॅप्टन बदलण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आगामी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघाने वनडेचा कॅप्टन मोहम्मद रिझवान याची हकालपट्टी केली असून एका जुन्याच खेळाडूला कॅप्टन म्हणून नियुक्त केलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानचा प्राईम बॉलर आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय

होय, बरोबर ओळखलंत, मोहम्मद रिजवान याला कर्णधारपदावरून हटवून शाहिन शाह आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट टीमचा नवा कॅप्टन बनवण्यात आलं आहे. पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे कसोटी क्रिकेट सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, 33 वर्षांचे रिजवान आणि 25 वर्षांचे शाहिन हे दोन्ही खेळाडू या मॅचमध्ये खेळत आहेत.
advertisement

शाहिन शाह आफ्रिदी पाकिस्तानचा नवा कॅप्टन

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहिन शाह आफ्रिदी याला कॅप्टन बनवण्याचं कोणतंही ठोस कारण दिलं नाही किंवा रिजवान यांना हटवण्याचंही कारण स्पष्ट केलं नाही. वाईट बॉल कोच माईक हेसन आणि सिलेक्शन कमिटी यांच्यात इस्लामाबादमध्ये झालेल्या मिटिंगमध्ये सर्व काही ठरले.

कारण काय?

पीसीबीने गेल्या आठवड्यात एक स्टेटमेंट जारी करून साऊथ आफ्रिका दौऱ्यापूर्वी मोहम्मद रिजवान याला कॅप्टन कायम ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच कारणामुळे हेड कोच माईक हेसन यांनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडे नवीन कॅप्टनची नियुक्ती करण्यासाठी निवड आणि सल्लागार समितीसोबत बैठक बोलावण्याची विनंती केली होती.
advertisement

पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, रिजवान यांना हटवण्यामागे हेड कोच माईक हेसन नाही, तर पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे. तसं पाहिले तर कॅप्टन म्हणून शाहिन शाह आफ्रिदी याचा पूर्वीचा रेकॉर्ड खूप खराब होता. वर्ल्ड कप 2023 नंतर बाबर आझम याचा कॅप्टन्सीवरून काढलं गेलं आणि शाहिन शाह याला कमान सोपवण्यात आली होती.
advertisement

सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर

शाहिन आफ्रिदी प्रथमच वनडेमध्ये कॅप्टन्सी करेल. त्याचे पहिलं मिशन साऊथ आफ्रिकाविरुद्धची वनडे सिरीज असेल. पुढील महिन्यात फैसलाबाद येथे तीन वन-डे मॅचेस खेळल्या जातील. आफ्रिदी हा गेल्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर होता. पाकिस्तान टी-20 टीमची कॅप्टन्सी सलमान अली आगा करतो. त्याला हटवण्यात बोर्डाने कोणताही रस दाखवला नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan Cricket : मोहम्मद रिझवानची कॅप्टन्सीवरून हकालपट्टी, पाकिस्तान संघाला मिळाला नवा कॅप्टन, 'प्राईम' घोड्यावर लावला डाव!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement