भारतातील सगळ्यात महाग असणाऱ्या जाहिरातीत एकत्र दिसले रणवीर सिंह आणि बॅाबी देओल , बजेट पाहून व्हाल हैरान..
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Ranveer Singh - Boby Deol : भारतातील सगळ्यात महाग जाहिरातीत रणवीर सिंग आणि बॅाबी देओल एकत्र दिसले. याचं बजेट सिनेमाच्या बजेट इतकं आहे.
भारतात कोणत्या ना कोणत्या विषयावर जाहिराती ह्या येतच असतात. बॅालिवूडचे अनेक चेहरे यात चमकताना दिसतात. तसेच काहिसे आता पाहायला मिळतेय. रणवीर सिंग, श्रीलीला आणि बॅाबी देओल एका जाहिरातीत एकत्र आलेत. ही जाहिरात भारतातील सगळ्यात महाग जाहिरात समजली जात आहे. या जाहिरातीचे बजेट काही सिनेमांच्या बजेटपेक्षा मोठे आहे. जाहिरातीच्या ट्रेलरमुळे लोकांना हा एक्शन सिनेमा वाटतो.
भारतातील सर्वात महागडी जाहिरात
या जाहिरातीमध्ये एक्शन आहेत, गाणी आहेत. बॅालिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या जाहिरातीचं बजेट हे 150 कोटी आहे. ही जाहिरात भारतातील सगळ्यात महाग जाहिरात मानली जाते. या जाहिरातीसाठी त्यांनी VFX आणि सेटचा वापर केला आहे.
advertisement
या जाहिरातीचे डायरेक्शन एटलीने केले आहे
रिपोर्टनुसार शाहरुखच्या जवान सिनेमाचा डायरेक्टर एटली कुमारने ही जाहिरात केली आहे. बॅालिवूडच्या कित्येक मोठ्या फिल्मपेक्षा मोठा बजेट या जाहिरातीचे आहे. विकी कौशलचा छावा (130 कोटी) आणि अजय देवगनच्या रेड2 (120 कोटी) पेक्षा जास्त बजेट या जाहिरातचे आहे.
चिंग्स शेजवानची ही जाहिरात आहे. रणवीर सिंहची हटके स्टाइल दिलत आहे. तो एजेंड चिंगच्या भुमिकेत दिसत आहे. रणवीर हा 2014 पासून चिंग्स शेजवान ब्रैंड एंबेसेंडर आहे.
advertisement
रणवीर सिंगच्या हिट चित्रपटांमध्ये 'बँड बाजा बारात, 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि 'गल्ली बॉय' यांचा समावेश आहे. तर बॅाबी देओलचे सोल्जर, बादल, बिच्छू, अजनबी, हमराज़, यमला पगला दीवाना, ॲनिमल आणि वेब सिरीज आश्रम हे त्याचे फेमस सिनेमे आणि वेब सिरीज आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 7:11 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
भारतातील सगळ्यात महाग असणाऱ्या जाहिरातीत एकत्र दिसले रणवीर सिंह आणि बॅाबी देओल , बजेट पाहून व्हाल हैरान..