advertisement

Pakistan Team : हॉटेलबाहेर 14 तास ताटकळत ठेवलं, भांडी घासायला लावली! पाकिस्तानी कॅप्टनच्या स्टेटमेंटने जगभरात खळबळ

Last Updated:

Pakistan hockey Australia tour controversy : मैदानावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मॅच खेळण्यापूर्वी चक्क भांडी घासावी लागली आणि रस्ते झाडावे लागलं, असा खळबळजनक खुलासा कॅप्टनने केलाय.

Pakistan hockey Australia tour controversy
Pakistan hockey Australia tour controversy
Pakistan Team controversy : एकीकडे टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव केला अन् पाकिस्तानची इज्जत धुळीस मिळवली. तर दुसरीकडे पाकिस्तानला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. पाकिस्तानच्या टीमला हॉटेलबाहेर 14 तास उभं रहावं लागलं. एवढंच काय तर मॅचआधी त्यांना भांडी देखील घासावी लागली. पाकिस्तानची टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून मायदेशी परतताच एका अत्यंत लज्जास्पद वादाला तोंड फुटलं आहे. टीमचा कॅप्टन शकील अम्माद बट याने पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर अतिशय गंभीर आरोप केलं आहेत.
ऑस्ट्रेलियात खेळाडूंना अत्यंत वाईट वागणूक मिळाल्याचं उघड केलं आहे. मैदानावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मॅच खेळण्यापूर्वी चक्क भांडी घासावी लागली आणि रस्ते झाडावे लागलं, असा खळबळजनक खुलासा कॅप्टनने लाहोर एअरपोर्टवर मीडियाशी बोलताना केला. या दौऱ्याची सुरुवातच पाकिस्तानसाठी अत्यंत खडतर राहिली. सिडनी एअरपोर्टवर पोहोचल्यावर संपूर्ण टीमला तब्बल 14 तास ताटकळत बसावे लागले.
advertisement
advertisement
त्यानंतर जेव्हा टीम कॅनबेरा येथे पोहोचली, तेव्हा हॉटेलचे बुकिंगच झाले नसल्याचे समोर आले. फेडरेशनने हॉटेलचे पैसे न भरल्यामुळे खेळाडूंना अनेक तास रस्त्यावर भटकावे लागले. विशेष म्हणजे, अशा मानसिक आणि शारीरिक त्रासानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच खेळावी लागली, ज्यामध्ये पाकिस्तानचा 2-3 असा पराभव झाला.
advertisement
कॅप्टन बट याने फेडरेशनच्या ढिसाळ नियोजनाचे वाभाडे काढताना सांगितले की, 13 दिवसांच्या दौऱ्यासाठी केवळ 10 दिवसांचे राहण्याचे नियोजन करण्यात आले होते. शेवटच्या 3 दिवसांत खेळाडूंना अत्यंत स्वस्त आणि गैरसोयीच्या ठिकाणी शिफ्ट व्हावे लागले. खेळाडूंनी याबद्दल आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची धमकी देऊन गप्प करण्यात आले. "आम्ही जे तिथे भोगले ते कोणत्याही खेळाडूसाठी असह्य आहे," अशा भावना बट याने व्यक्त केल्या आहेत.
advertisement
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पाकिस्तानातील क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डाने स्पष्ट केलं आहे की, त्यांनी टीमच्या निवासासाठी आणि इतर खर्चासाठी 10 मिलियन पाकिस्तानी रुपयांहून अधिक निधी दिला होता. इतकी मोठी रक्कम देऊनही खेळाडूंना भांडी घासावी लागली असतील, तर तो पैसा नेमका गेला कुठं, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पीएसबीच्या महासंचालकांनी या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट तयार केला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan Team : हॉटेलबाहेर 14 तास ताटकळत ठेवलं, भांडी घासायला लावली! पाकिस्तानी कॅप्टनच्या स्टेटमेंटने जगभरात खळबळ
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement