advertisement

PAK vs NAM : नामिबियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाऊस आला तर पाकिस्तानचा 'खेळ खल्लास'? जाणून घ्या सुपर 8 चं समीकरण

Last Updated:

Pakistan vs Namibia Weather Update : जर नामीबियाने पाकिस्तानला पराभूत केलं, तर 4 पॉइंट्ससह युएसए सरळ सुपर-8 साठी पात्र ठरेल. पण पाऊस आला तर कोण बाहेर जाणार? जाणून घ्या

Pakistan vs Namibia Weather Update
Pakistan vs Namibia Weather Update
T20 World Cup PAK vs NAM Match : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान आणि नामीबिया यांच्यात 18 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लबवर महत्त्वाचा सामना पार पडणार आहे. पाकिस्तानसाठी ही मॅच म्हणजे 'आर या पार'ची लढाई असेल. यात पराभव पत्करावी लागल्यास सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील टीमला ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळावा लागेल. 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध झालेल्या 61 रन्सच्या मोठ्या पराभवामुळे पाकिस्तानी गोटात सध्या चिंतेचे वातावरण पसरले होतं अशातच आता पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यातील सामन्यावर पावसाचं संकट पहायला मिळत आहे.

नामीबियाने पाकिस्तानला पराभूत केलं तर...

भारताकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचा नेट रन रेट (NRR) कमालीचा खालावला असून, ते आता पॉइंट्स टेबलमध्ये युएसएच्या खाली घसरले आहेत. विशेष म्हणजे, ज्या युएसएला पाकिस्तानने आधी हरवले होते, तीच युएसए टीम पाईंट्स टेबलमध्ये आता त्यांच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे. जर नामीबियाने पाकिस्तानला पराभूत केले, तर 4 पॉइंट्ससह युएसए सरळ सुपर-8 साठी पात्र ठरेल. युएसएने यापूर्वी नेदरलँड्स आणि नामीबियाला धूळ चारल्याने त्यांचं पारडं जड दिसत आहे.
advertisement

कोलंबोत 80 टक्क्यांपर्यंत आर्द्रता

कोलंबोमधील हवामानाचा अंदाज घेतला असता, सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होईल, तेव्हा पावसाची फारशी शक्यता नसल्याने क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. येथील तापमान 24 ते 28 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून, 80 टक्क्यांपर्यंत आर्द्रता (humidity) राहण्याचा अंदाज आहे. खेळाडूंना मैदानावर उष्णतेचा आणि दमट हवेचा सामना करावा लागणार आहे.
advertisement

युएसएचे आव्हान संपुष्टात?

दरम्यान, पावसामुळे जर ही मॅच रद्द झाली, तर त्याचा थेट फायदा पाकिस्तानला मिळू शकतो. मॅच रद्द झाल्यास दोन्ही टीम्सना 1-1 पॉइंट वाटून दिला जाईल, ज्यामुळे पाकिस्तानचे 5 पॉइंट्स होतील. अशा स्थितीत 4 पॉइंट्सवर असलेल्या युएसएचे आव्हान संपुष्टात येईल आणि पाकिस्तान पुढच्या फेरीत प्रवेश करेल. झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द झाल्याने ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया बाहेर पडली होती, तशीच स्थिती येथे युएसएची होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs NAM : नामिबियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाऊस आला तर पाकिस्तानचा 'खेळ खल्लास'? जाणून घ्या सुपर 8 चं समीकरण
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement