पंजाबच्या खेळाडूने पराभवाचा राग काढला, 209च्या स्ट्राईकने चोप चोप चोपलं, संघाला 9 विकेटसने सामना दिला जिंकून

Last Updated:

आयपीएलच्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने पंजाब किंग्जचा पराभव केला होता. हा पराभव होऊन आता जवळपास आता 10-12 दिवस उलटले आहेत.या पराभवाची सल अजूनही पंजाबच्या खेळाडूंच्या मनात आहेत.

r ashwin dindigul dragon defeat madurai panthers
r ashwin dindigul dragon defeat madurai panthers
TNPL 2025 : आयपीएलच्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने पंजाब किंग्जचा पराभव केला होता. हा पराभव होऊन आता जवळपास आता 10-12 दिवस उलटले आहेत.या पराभवाची सल अजूनही पंजाबच्या खेळाडूंच्या मनात आहेत. यातूनच आता पंजाबच्या एका खेळाडूने पराभवाचा राग काढला आहे.या खेळाडूने प्रतिस्पर्ध्यांना चोपून काढत सामना जिंकून दिला आहे.
खरं तर तामिळनाडू प्रिमियर लीगमध्ये आज मदुराई पॅथर्स आणि दिंडीगुल ड्रॅगनमध्ये सामना रंगला होता.या सामन्यात मदुराई पॅथर्सने प्रथम फलंदाजी करताना 150 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे दिंडीगुल ड्रॅगन समोर 151 धावांचे आव्हान होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना दिंडीगुल ड्रॅगनची सूरूवात चांगली झाली होती.कर्णधार रविचंद्रन अश्विनने 49 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर आयपीएलमध्ये पंजाबच्या ताफ्यात असलेल्या शिवम सिंहने वादळीच खेळी केली. त्याने तब्बल 41 बॉलमध्ये 86 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले आहेत. त्याच्या जोडीला हनी सैनी होता त्याने 14 धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे अश्विनच्या दिंडीगुल ड्रॅगनने 13 ओव्हरमध्येच 9 विकेट राखून ही मॅच जिंकली.
advertisement
मुदराई पॅथर्सकडून आतिक रहमाने 50 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. त्याच्या जोडीला अनिरूद्ध सिरामने 31 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर मदुराई पॅथर्सने 20 ओव्हरमध्ये 150 धावा केल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पंजाबच्या खेळाडूने पराभवाचा राग काढला, 209च्या स्ट्राईकने चोप चोप चोपलं, संघाला 9 विकेटसने सामना दिला जिंकून
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement