वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या खास दोन खेळाडूंमध्ये चढाओढ, कोणाला मिळणार संधी?

Last Updated:

'या' खेळाडूमुळे तुटू शकतं अश्विनचं क्रिकेट वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न; कसं ते वाचा

वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी टीम इंडियात कोणाला संधी?
वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी टीम इंडियात कोणाला संधी?
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमच्या आयसीसी वन-डे वर्ल्ड कप टीममध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टीम इंडियातील ऑल राउंडर खेळाडू अक्षर पटेल आशिया कपदरम्यान जखमी झालेला आहे. तो वर्ल्ड कप खेळेल की नाही याला अद्याप काहीही दुजोरा मिळालेला नाही. निवडकर्त्यांनी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरिजसाठी टीममध्ये निवडलं होतं. पण, तो शेवटच्या मॅचपर्यंत तंदुरुस्त झाला नाही. अक्षरच्या अनुपस्थितीमध्ये आर अश्विनला वन-डे टीममध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली आणि त्याने चांगली कामगिरीही केली. आता अश्विन आणि अक्षरपैकी कोण वर्ल्ड कप खेळेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
क्रिकेट वर्ल्ड कप 2023च्या आधी टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सीरिज खेळत आहे. ही सीरिज दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मानली जात आहे. भारतानं पहिल्या दोन मॅचेसमध्ये टीममधील सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिली. तर, निवडकर्त्यांनी आर. अश्विनला अचानक टीममध्ये स्थान दिलं. 19 महिन्यांनंतर तो वन-डे मॅच खेळला. आता त्यानं वर्ल्ड कपमध्ये खेळावा की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षर पटेलला पर्याय म्हणून अश्विनच्या नावाचा विचार केला जात आहे. पण, बोर्डाला अजूनही अक्षरच्या पुनरागमनाची पूर्ण आशा आहे.
advertisement
अक्षर फिट झाला तर अश्विनला संधी मिळणार नाही
रविचंद्रन अश्विननं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण, अक्षर योग्य वेळी तंदुरुस्त होईल, अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, "संघ व्यवस्थापन अक्षरला दुखापतीतून सावरण्यासाठी पूर्ण संधी देऊ इच्छित आहे. त्याच्या बोटाची दुखापत बरी झाली असून, येत्या काही दिवसांत तो वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच 8 ऑक्टोबरला आहे आणि त्यामुळे अजून पुरेसा वेळ आहे."
advertisement
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आशिया कप 2023 क्रिकेट स्पर्धेदरम्यान अक्षर जखमी झाला होता. सध्या तो एनसीएमध्ये रिहॅब प्रक्रियेतून जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षर वर्ल्ड कपपूर्वी तंदुरुस्त होऊ शकतो. वर्ल्ड कपच्या प्रॅक्टिस मॅचेसमध्ये तो खेळताना दिसू शकतो. टीम इंडिया 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध आपली पहिली प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या खास दोन खेळाडूंमध्ये चढाओढ, कोणाला मिळणार संधी?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement