advertisement

टीम इंडियात एन्ट्री करण्याचं तिघांचं स्वप्न, पण तीनही मुंबईकरांचा फ्लॉप परफॉर्मन्स, कामगिरी पाहून डोक्यावर हात माराल

Last Updated:

भारताचे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी टीम इंडियाकडून खेळताना एक काळ गाजवला होता.आता त्यापैकीच काही खेळाडू पुन्हा टीम इंडियात वापसीची तयारी करतायत.

mumbai ranji team
mumbai ranji team
Ranji Trophy 2025-26 : भारताचे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी टीम इंडियाकडून खेळताना एक काळ गाजवला होता.आता त्यापैकीच काही खेळाडू पुन्हा टीम इंडियात वापसीची तयारी करतायत. यामध्ये काही खेळाडूंनी उघडपणे मला संघात संधी दिली नसल्याचे बोलताना देखील दिसत आहेत. मात्र या दरम्यान देशांतर्गत सुरू असलेल्या सामन्यात हेच खेळाडू फ्लॉप ठरताना दिसले आहे.त्यामुळे हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
खरं तर रणजी ट्रॉफी ईलाईट 2025-26 स्पर्धेत मुंबई विरूद्ध राजस्थान या दोन संघात सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे. मुंबईच्या अजिंक्य रहाणे, कर्णधार शार्दुल ठाकूर आणि सरफराज खान हे तीनही खेळाडू फ्लॉप ठरले होते. हे तीनही खेळाडू टीम इंडियातून खेळण्याची स्वप्न पाहतायत. पण या खेळाडूंनी राजस्थान विरूद्ध खेळताना अजिंक्य रहाणेच्या बॅटीतून फक्त 3 धावा आल्या आहेत. सरफराज खानने 15 तर कर्णधार शार्दुल ठाकूरने 18 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात देखील हे खेळाडू फ्लॉप ठरले होते.
advertisement
जम्मू काश्मिरमधील पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे पहिल्या डावात 27,सरफराजने 42 तर शार्दुल ठाकूर शु्न्यावर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे शुन्यावर,सरफराज 32 आणि शार्दुल ठाकूर 9 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे या धावा पाहून या खेळाडूंना खरंच संघात संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबईकडून खेळताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. या व्यतिरीक्त मुशीर खानने 49 धावा केल्या होत्या. यापैकी इतर खेळाडू फारशा सन्मानजनक धावा करू शकली नाही.त्यामुळे मुंबईचा पहिला डाव हा 254 धावांवर ऑल आऊट झाला होता. राजस्थानकडून कुकना अजय सिंहने 4 विकेट,अशोक शर्माने 3 विकेट, राहुल चहर, अंकित चौधरी, आकाश सिंहने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
advertisement
राजस्थानच्या पहिल्या डावाला सूरूवात झाली आहे. राजस्थानने पहिल्या दिवसअखेर 10 धावा करत एकही विकेट गमावली नाही आहे. राजस्थान अजून 244 धावा दूर आहे. आता मुंबईचे गोलंदाज राजस्थानला किती धावात रोखतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियात एन्ट्री करण्याचं तिघांचं स्वप्न, पण तीनही मुंबईकरांचा फ्लॉप परफॉर्मन्स, कामगिरी पाहून डोक्यावर हात माराल
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement