जडेजाच्या नजरेत आला अन् 'रेड अलर्ट'मुळे थांबवावी लागली LIVE मॅच, प्रेक्षकाने असं काय केलं? Video व्हायरल

Last Updated:

Jadeja distracted by red shirt : साईटस्क्रीनखाली एक माणूस लाल रंगाचा शर्ट घातलेला दिसला. त्याच्या लाल रंगाच्या शर्टमुळे जडेजा विचलित होत होता, पण तो माणूस एक इंचही हलायला तयार नव्हता.

Jadeja distracted by red shirt
Jadeja distracted by red shirt
Red shirt turns into green : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलच्या मैदानावर सामना सुरू होता. भारताच्या टॉप ऑर्डर लवकर ढेपाळल्याने रवींद्र जडेजा याला बॅटिंगला यावं लागलं. रवींद्र जडेजाने आपल्या अफलातून फलंदाजीने सर्वांना चकित केलं अन् पुन्हा ओव्हलच्या मैदानावर पाय रोवले. यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी भेदक मारा केला. यावेळी एका प्रेक्षकामुळे रवींद्र जडेजा अस्वस्थ झाला होता. समोरच्या साईटस्क्रीनच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकामुळे जडेजाला त्रास होत होता.

जडेजाची अंपायरकडे तक्रार

साईटस्क्रीनखाली एक माणूस लाल रंगाचा शर्ट घातलेला दिसला. त्याच्या लाल रंगाच्या शर्टमुळे जडेजा विचलित होत होता, पण तो माणूस एक इंचही हलायला तयार नाहीये, असं दिसल्याने जडेजाने अंपायरकडे तक्रार केली. अंपायरने देखील याची दखल घेतली आणि स्टेडियम अंपायरकडे तक्रार कळवली. त्यानंतर प्रेक्षकाला नवीन टी-शर्ट देण्यात आला. प्रेक्षकाने हिरवा टी- शर्ट घातला आणि सामन्याची मजा घेतली.
advertisement

पाहा Video

नाइटवॉचमनची फिफ्टी

advertisement
ओव्हल येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने महत्त्वाची आघाडी घेतली आहे. यशस्वी जयस्वालच्या शानदार शतकासह, आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकांच्या जोरावर भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. नाइटवॉचमन म्हणून आलेला आकाश दीप याने अप्रतिम फलंदाजी करत आपले पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांनीही प्रत्येकी 53 धावा करत महत्त्वपूर्ण अर्धशतके झळकावली.
advertisement

इंग्लंडसमोर 374 धावांचे आव्हान 

दरम्यान, सामना जिंकण्यासाठी आणि मालिका बरोबरीत आणण्यासाठी 374 धावांचे आव्हान घेऊन इंग्लंडने आपला दुसरा डाव सुरू केला. सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी सकारात्मक सुरुवात करत 50 धावांची भागीदारी रचली आणि भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. मात्र, दिवसाच्या खेळातील शेवटच्याच बॉलवर मोहम्मद सिराजने भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. सिराजच्या भेदक यॉर्करने झॅक क्रॉलीला 14 धावांवर बोल्ड केलंय.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
जडेजाच्या नजरेत आला अन् 'रेड अलर्ट'मुळे थांबवावी लागली LIVE मॅच, प्रेक्षकाने असं काय केलं? Video व्हायरल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement