Ravindra Jadjea : ...म्हणून 4 कोटी रुपये कमी घेतले, जडेजाने राजस्थान रॉयल्ससोबत केली मोठी डील!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
जडेजाला सीएसकेकडून 18 कोटी रुपये वर्षाला मिळत होते, पण त्याने 14 कोटी रुपयांमध्ये राजस्थान रॉयल्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : 2026 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न चर्चेचा विषय राहिला आहे. यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग हे संभाव्य कर्णधार म्हणून मानले जात होते, पण आता रवींद्र जडेजाचे नावही चर्चेत आले आहे. संजू सॅमसनसोबतच्या ट्रेड डीलद्वारे जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये आला.
राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर रवींद्र जडेजाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो म्हणजे जडेजा राजस्थानचा पुढचा कर्णधार असू शकतो, याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे. राजस्थान रॉयल्सने जडेजाच्या फोटोला 'थलापथी' असे कॅप्शन दिले आहे, ज्याचा अर्थ "कमांडर" असा होतो. जर तसे असेल तर, रवींद्र जडेजा आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कमांडर किंवा नेता असू शकतो. जडेजाला सीएसकेकडून 18 कोटी रुपये वर्षाला मिळत होते, पण त्याने 14 कोटी रुपयांमध्ये राजस्थान रॉयल्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
दरम्यान, आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचे सामने पुण्यात खेळवल्या जाऊ शकतात असे वृत्त आयएएनएसने दिले आहे. जयपूरची जागा घेऊन पुणे हे पुढील हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचं होम ग्राउंड बनू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात करार होण्याच्या जवळ आहे.
Thalapathy pic.twitter.com/xPPX5z3Sco
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 4, 2026
advertisement
राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबत सुरू असलेल्या मतभेदांमुळे, राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने पुढील हंगामासाठी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमला आपले होम ग्राउंड न बनवण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने आरआर फ्रँचायझीवर मॅच फिक्सिंगचा आरोप केल्यानंतर हे मतभेद निर्माण झाले. राजस्थान रॉयल्सने हे आरोप फेटाळून लावले आणि खोट्या आरोपांवर कठोर कारवाईची मागणी केली.
advertisement
पुण्यासोबतच गुवाहाटीमधील बरसापारा स्टेडियम हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड असू शकते. लवकरच याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 11:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ravindra Jadjea : ...म्हणून 4 कोटी रुपये कमी घेतले, जडेजाने राजस्थान रॉयल्ससोबत केली मोठी डील!










