advertisement

Ravindra Jadeja : 'टीम इंडियाचे खेळाडू परदेशात जाऊन...', जडेजाच्या पत्नीचे गंभीर आरोप, भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ!

Last Updated:

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने एका कार्यक्रमात टीम इंडियाच्या खेळाडूंवर आरोप केले, त्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे.

'टीम इंडियाचे खेळाडू परदेशात जाऊन...', जडेजाच्या पत्नीचे गंभीर आरोप, भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ!
'टीम इंडियाचे खेळाडू परदेशात जाऊन...', जडेजाच्या पत्नीचे गंभीर आरोप, भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ!
मुंबई : टीम इंडियाचा अनुभवी ऑलराऊंडर रवींद्र जडेजाची पत्नी आणि गुजरात सरकारमधील मंत्री रिवाबा जडेजा पुन्हा एकदा तिच्या वक्तव्याने चर्चेत आली आहे. रिवाबा जडेजाने एका कार्यक्रमात टीम इंडियाच्या खेळाडूंवर आरोप केले, त्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. रिबावा जडेजाचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
कार्यक्रमादरम्यान रिवाबा जडेजाने पती रवींद्र जडेजाचं इमानदारी आणि शिस्तीसाठी कौतुक केलं, पण हे बोलताना रिवाबाने इतर खेळाडूंवर निशाणा साधला. 'रवींद्र जडेजा लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशांमध्ये खेळायला जातो, पण त्याला कधी चुकीच्या सवयी आणि व्यसन लागली नाहीत. टीमचे इतर खेळाडू परदेशात जाऊन चुकीचं काम करतात', रिवाबा जडेजाच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे, तसंच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधल्या संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
advertisement
'जडेजालाही या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या, त्याला यासाठी मला विचारायचीही गरज नव्हती. पण त्याला स्वत:च्या जबाबदाऱ्या कळतात आणि तो कायमच शिस्त पाळतो', असं रिबावा जडेजा म्हणाली आहे. रिवाबा जडेजाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्य करण्याची रिवाबाची ही पहिलीच वेळ नाही, पण यावेळी रिवाबाने क्रिकेटपटूंविषयी वक्तव्य केल्यामुळे वाद झाला आहे.
advertisement

जडेजा राजस्थानकडून खेळणार

आयपीएल 2026 मध्ये जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. जडेजा मागच्या मोसमापर्यंत सीएसकेचा भाग होता, पण राजस्थान आणि सीएसके यांच्या संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात डील झाली. आयपीएलच्या पहिल्या मोसमात 2008 साली जडेजाने राजस्थानकडूनच पदार्पण केलं होतं आणि आता करिअरच्या उत्तरार्धात जडेजा पुन्हा एकदा राजस्थानकडूनच खेळताना दिसेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ravindra Jadeja : 'टीम इंडियाचे खेळाडू परदेशात जाऊन...', जडेजाच्या पत्नीचे गंभीर आरोप, भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement