IND vs SA सामन्यात मोठा ड्रामा, कॅप्टन पंत स्टार खेळाडूवर भडकला, सगळ्यांसमोर सुनावलं, मैदानातला VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सामन्यादरम्यान मोठा राडा झाला होता.टीम इंडियाचा कर्णधार रिषभ पंत खेळाडूंवर भडकताना दिसला होता.या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
India vs South Africa 2nd Test : गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर सूरू असलेल्या भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसरा दिवसाचा खेळ संपला आहे. यावेळी दुसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत 489 धावा ठोकून टीम इंडियाला रडकुंडिला आणलं होतं. दरम्यान या सामन्यादरम्यान मोठा राडा झाला होता.टीम इंडियाचा कर्णधार रिषभ पंत खेळाडूंवर भडकताना दिसला होता.या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
खरं तर 87 वी ओव्हर टाकायला कुलदीप यादव मैदानात आला होता.यावेळी तो गोलंदाजीचा सराव करत होता. या सरावाचा वेळ दोन मिनिटांच्या मर्यादेपेक्षा जास्त गेला. मैदानावरचा टायमर सतत चालू असतो आणि तो मर्यादा ओलांडताच अंपायनेर भारतीय कर्णधार ऋषभ पंतला टाईम वॉर्निंग दिली होती. ही वॉर्निंग मिळताच ऋषभ पंत भडकला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
🚨🚨 Just 2nd test match as captain & Rishabh Pant is already so frustrated:
"ghar pe khelre ho kya, mzaak bna rkha hai test cricket ka".
There was barely any control we could see from Pant over players. Not signs of a good leader at all.pic.twitter.com/CCg4HrYK4J
— Rajiv (@Rajiv1841) November 23, 2025
advertisement
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये रिषभ पंत म्हणतो टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज कुलदीप यावदवर भडकला आहे. 30 सेकंदाची वेळ आहे, घरी खेळताय का? एक बॉल टाक लवकर, अरे यार कुलदीप दोन्ही वेळेस वॉर्निग घेतलीस.संपूर्ण ओव्हर एक ओव्हर थोडी ना पाहिजे आहे. मजाक बनवून ठेवला आहे टेस्ट क्रिकेटचा,अशा शब्दात ऋषभ पंत कुलदीप यादववर भडकला होता.तसेच फिल्ड लावायला मला दे आणि तू टप्प्यावर बॉल टाकायचा बघ. भावा होऊन जाईल काम, कालचा संपूर्ण दिवस आपण मेहनत केली आहे,सोडणार नाही, काम करत राहा,अशा शब्दात तो खेळाडूंचा आत्मविश्वासही वाढवत होता.
advertisement
साऊथ आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर 6 विकेट गमावून 247 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे दुसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिका लवकर ऑल आऊट होईल अशी अपेक्षा होती. पण साऊथ आफ्रिकेच्या सेनुरन मथुसामीने 109 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 10 चौकार मारले होते. त्याच्यासोबत मार्को यान्सने 93 धावांची खेळी केली होती.या खेळीत त्याने 7 षटकार आणि 6 चौकार लगावले आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या शतकीय आणि अर्धशतकीय खेळीच्या बळावर साऊथ आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 6:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA सामन्यात मोठा ड्रामा, कॅप्टन पंत स्टार खेळाडूवर भडकला, सगळ्यांसमोर सुनावलं, मैदानातला VIDEO


