Team India : भारताचा जखमी वाघ मैदानात परतणार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान डरकाळी फोडणार,कोण आहे खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
येत्या 19 ऑक्टोबरपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाचा वाघ मैदानात परतणार आहे.
Team India News : येत्या 19 ऑक्टोबरपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाचा वाघ मैदानात परतणार आहे. खरं तर इंग्लंड विरूद्ध टेस्ट मालिकेत टीम इंडियाचा हा वाघ जखमी झाला होता. पण आता तो मैदानान उतरण्यास सज्ज झाला आहे.
हा वाघ दुसरा तिसरा कुणी नसून रिषभ पंत आहे.रिषभ पंत हा इंग्लंड विरूद्ध मालिके दरम्यान जखमी झाला होता.त्यानंतर अनेक दिवसांपासून तो दुखापतीतुन सावरत होता.आता तो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रणजी ट्रॉफीमध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता आहे.टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिली आहे. खरं तर पंतच्या उजव्या पायाची तपासणी येत्या आठवड्यात सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून केली जाईल.त्यानंतर त्यांच्या मैदानात उतरण्याबाबत स्पष्टता येणार आहे.
advertisement
सध्या १० ऑक्टोबरपर्यंत त्याला क्लिअर मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात त्याचे मूल्यांकन होणार आहे. त्याच्या प्रकृतीत बराच काळ गेला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला त्याच्यासोबत कोणताही धोका पत्करायचा नाही," असे बीसीसीआयच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.
मिडिया रिपोर्टनुसार, पंतने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) चे अध्यक्ष रोहन जेटली यांना रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.तसेच पंतने 25 ऑक्टोबरपासून दिल्लीत होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यांसाठी तो उपलब्ध असावा असे म्हटले आहे. त्याने असे कळवले आहे की ते फिटनेस आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून मिळालेल्या मंजुरीच्या अधीन असेल,असे डीडीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.त्यामुळे टीम इंडियाचा हा जखमी वाघ मैदानात परतण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात झालेल्या फ्रॅक्चर झालेल्या पायाच्या दुखापतीतून पंत बरा होऊ शकला नाही, त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आणि ऑस्ट्रेलियाच्या आगामी व्हाईट बॉल दौऱ्यात खेळू शकला नाही. सुरुवातीला दुखापत बरी होण्यासाठी सहा आठवडे लागतील असे वाटत होते, परंतु दुखापतीनंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी बाहेर पडताना त्याच्या उजव्या पायाचा मेटाटार्सल स्नायू त्याच्यावर असलेल्या दबावामुळे तुटला होता.आता त्याने दिर्घकाळ विश्रांती घेतली आहे आणि तो बरा देखील होतोय.त्यामुळे तो लवकर मैदानात परतेल अशी आशा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 11:40 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : भारताचा जखमी वाघ मैदानात परतणार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान डरकाळी फोडणार,कोण आहे खेळाडू?