Rohit Sharma : विराटने सेंच्युरी ठोकली, रोहितने सगळं फ्रस्ट्रेशन काढलं! हिटमॅनने खरंच शिवीगाळ केली? Video आला समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma Reaction Video : विराट कोहलीच्या सेंच्युरीनंतर रोहित शर्माचा कथित शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Rohit Sharma On Virat Kohli Century : साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताचे माजी कर्णधार विराट कोहली यांनी 135 धावांची एक दमदार इनिंग खेळून फॅन्सचे मन जिंकले. त्यांच्या या उत्कृष्ट परफॉर्मन्सच्या जोरावर टीम इंडियाने 349 धावांचा मोठा टारगेट उभारला आणि अखेरीस 17 धावांनी मॅच जिंकण्यात यश मिळवले. या मॅचमध्ये कोहलीने आपल्या वनडे करिअरमधील 52 वे शतक पूर्ण केले. पण, या शतकावर कर्णधार रोहित शर्मा यांनी ज्या अनोख्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
कोहलीने शतक पूर्ण करताच रोहित आनंदात उछळले आणि मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवताना दिसले. मात्र, याचवेळी रोहितने उभे राहून टाळ्या वाजवत असतानाच, रागाने काहीतरी बोलल्याचा एक्स्प्रेशन दिलं, जे कॅमेऱ्यात कैद झालं आहे. रोहितचं हे मिक्स रिअँक्शन (आनंद आणि राग) सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे आणि चाहते यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. रोहितने शिवी देत आपला राग व्यक्त केला, असं पहायला मिळालं.
advertisement
पाहा Video
Rohit Sharma reacts to Kohli's century with a clear message from the stands to the selectors and coach .
Look at Rohit Sharma's lips #INDvSA #ViratKohli #RohitSharma pic.twitter.com/DUTNC3eE30
— Mamta Jaipal (@ImMD45) November 30, 2025
advertisement
कोहलीच्या या सेंच्युरीमुळे तो एकाच फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या लिस्टमध्ये खूप पुढे गेला आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरच्या 51 शतकांच्या रेकॉर्डलाही मागे टाकले आहे. युवा यशस्वी जयस्वाल लवकर आऊट झाल्यानंतर रोहित आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 136 धावांची पार्टनरशिप केली. हे इंटरनॅशनल क्रिकेटमधील कोहलीचे 83 वं शतक होते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 100 शतकांचा विक्रम असलेल्या सचिन तेंडुलकरपासून कोहली आता केवळ 17 शतके मागे आहे.
advertisement
दरम्यान, या मॅचमध्ये टीम इंडियाने प्रथम बॅटिंग करताना 349 धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर देताना साऊथ आफ्रिका संघ 332 धावांवर ऑल आऊट झाला. 17 धावांनी विन झालेल्या टीम इंडियाकडून विराट कोहलीला त्याच्या दमदार 135 धावांच्या इनिंगसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : विराटने सेंच्युरी ठोकली, रोहितने सगळं फ्रस्ट्रेशन काढलं! हिटमॅनने खरंच शिवीगाळ केली? Video आला समोर


