Rohit Sharma VIDEO : 'मुलाचं डायपर बदलण्यापेक्षा...', रोहित शर्माची खतरनाक फिरकी, कुलदीप आता कधीच DRS मागणार नाही!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने चायनामॅन कुलदीप यादवला डीआरएसवरून मैदानात झापल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या संदर्भातले व्हिडिओ देखील समोर आले आहेत. त्यानंतर आता भर रस्त्यात रोहित शर्माने कुलदीप यादवची फिरकी घेतली आहे.
Rohit Sharma Kuldeep Yadav DRS : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने चायनामॅन कुलदीप यादवला डीआरएसवरून मैदानात झापल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या संदर्भातले व्हिडिओ देखील समोर आले आहेत. त्यानंतर आता भर रस्त्यात रोहित शर्माने कुलदीप यादवची फिरकी घेतली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे जर हा व्हिडिओ कुलदीप यादवने पाहिला तर आता तो कधीच डिआरएस मागणार नाही. दरम्यान रोहितच्या या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माला विचारलं जातं,तुला आयुष्यातली कोणती गोष्ट टाळायला आवडेल? यावर त्याला मुलाचे डायपर आणि क्लिन शेव असे पर्याय दिले जातात. पण रोहित हे कोणतेच पर्याय न वापरता थेट कुलदीप यादवचा डिआरएस टाळायला आवडेल असे तो म्हणाला आहे.त्यामुळे रोहित शर्माने एकप्रकारे कुलदीप यादवची फिरकी घेतली आहे. रोहित शर्माचे हे उत्तर पाहून कुलदीप यादव आता कधीच डीआरएस मागणार नाही आहे.
advertisement
Question : "RO what you avoid the most changing diaper or getting clean shave?
Rohit Sharma funny answer : "Kuldeep taking that review"😂❤️ pic.twitter.com/oXpHdScaeP
—
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 6:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma VIDEO : 'मुलाचं डायपर बदलण्यापेक्षा...', रोहित शर्माची खतरनाक फिरकी, कुलदीप आता कधीच DRS मागणार नाही!









