Rohit Sharma : 'भूतकाळात जे झालं ते झालं...', सूर्याच्या उत्तराने रोहितचं तोंड पडलं, हिटमॅन म्हणतो 'मला फरक पडत नाही जर...'

Last Updated:

Rohit Sharma On Ahmadabad world cup finals : सूर्याने रोहितच्या जखमेवरची खपली काढली. अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनलचा सामना खेळायला आवडेल, असं सूर्या म्हणाला.

Rohit Sharma On Ahmadabad world cup finals
Rohit Sharma On Ahmadabad world cup finals
Rohit Sharma Brand Ambassador : आयसीसीने रोहित शर्माचा मोठा सन्मान केला आहे. भारतामध्ये पुढच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्ल्ड कपचा ब्रँड ॲम्बेसिडर आता रोहित शर्मा असणार आहे, याची घोषणा आयसीसीकडून करण्यात आली आहे. मी पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप खेळणार नाही. हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे, पण मला घरी टीव्हीवर सामने पाहण्याची सवय झाली आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. यावेळी वनडे वर्ल्ड फायनलवर प्रश्न विचारल्यावर रोहित शर्माचा चेहरा पडला. त्यावेळी त्याने मोठ्या मनाने उत्तर दिलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनलचा सामना, सूर्या म्हणतो...

टीम इंडिया आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गेली तर कोणती टीम समोर असावी असं वाटतं आणि कोणत्या स्टेडियमवर? असा सवाल रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला विचारला गेला. त्यावेळी सूर्याने रोहितच्या जखमेवरची खपली काढली. अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनलचा सामना खेळायला आवडेल, असं सूर्या म्हणाला. सूर्याच्या उत्तरावर रोहित शर्माला माईक देण्यात आला. त्यावेळी रोहित शर्माने एक हात लांब ठेऊन उत्तर दिलं.
advertisement

भूतकाळात जे झालं ते झालं... - रोहित शर्मा

टीम इंडिया फायनलमध्ये जावी, असं मला देखील वाटतं. पोरं त्यासाठी मेहनत घेत आहेत. मी एका कोणत्या टीमवर बोट ठेऊ शकत नाही. ही टीम हवी की ती टीम हवी... भुतकाळात जे झालं ते झालं. सूर्या जे म्हणाला, ती मनातली खूप हार्ड गोष्ट आहे. टीम इंडिया फानयलमध्ये जावी आणि जिंकणं हे पाहणं मला आवडेल. बाकीचे काय म्हणतात, हे मला माहिती नाही पण मला विरोधी संघ कोणता आहे, याने मला फरक पडत नाही, असं रोहित शर्मा म्हणाला.
advertisement
advertisement

रोहितच्या चेहऱ्यावर नाराजी

अहमदाबादमधील त्या फायनल सामन्यानंतर देव दयाळू आहे, असं मला वाटतं. आम्ही फायनलमध्ये गेलो आणि फायनल खेळलो, हा एक चमत्कार होता आणि त्यानंतर आम्ही 8 महिन्यानंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. त्यामुळे मी खूप आनंदी होतो, असं रोहित शर्मा म्हणाला. मात्र, रोहितच्या चेहऱ्यावर वनडे वर्ल्ड कप जिंकलो नाही, याची नाराजी स्पष्ट दिसत होती.
advertisement
दरम्यान, आयसीसीने मंगळवारी 2026 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले, ज्यामध्ये गतविजेत्या भारताला पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियासह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाला श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि ओमानसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'भूतकाळात जे झालं ते झालं...', सूर्याच्या उत्तराने रोहितचं तोंड पडलं, हिटमॅन म्हणतो 'मला फरक पडत नाही जर...'
Next Article
advertisement
Raj Thackeray :  'पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण एमएमआर...”
'पोटातली मळमळ ओकतायत”,‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त,“ संपूर्ण MMR...
  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

View All
advertisement