IND vs AUS : भारतासमोर पेच, अर्धा संघ 'आऊट'; रोहितसमोर प्लेइंग 11 निवडण्याचं आव्हान
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघासमोर मोठा पेच आहे. भारतात राजकोट वनडेसाठी प्लेइंग ११ निवडण्याचे संकट निर्माण झाले आहे.
राजकोट, 27 सप्टेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिले दोन सामने जिंकून भारताने विजयी आघाडी घेतलीय. आता तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीपची संधी भारतीय संघाकडे असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांचे संघात पुनरागमन होईल. तर ऑस्ट्रेलियाच्या संघात पॅट कमिन्स अन् मिशेल स्टार्क परतण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या दोन गोलंदाजांविरुद्ध आपली तयारी कशी आहे हे पाहण्याची संधी असेल. दरम्यान, तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघासमोर मोठा पेच आहे. भारतात राजकोट वनडेसाठी प्लेइंग ११ निवडण्याचे संकट निर्माण झाले आहे.
भारताकडे या सामन्यात निवडण्यासाठी केवळ १३ खेळाडूच आहेत. शुभमन गिल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या तिसऱ्या सामन्यात खेळणार नाहीत. यातील काही खेळाडू आजारी आहेत तर काहींनी घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. तर अक्षर पटेल दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो सुद्धा सामन्यात नसेल. अशा परिस्थितीत भारताला १३ पैकी ११ खेळाडू निवडावे लागतील.
advertisement
भारतीय संघ आता रुळावर येताना दिसत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली फॉर्ममध्ये आहेत. श्रेयस अय्यरने इंदौर वनडेत शतक केलं. तर सूर्यकुमार यादवही फिनिशरच्या भूमिकेत चांगली कामगिरी करत आहे. सध्या एकच प्रश्न आहे तो विकेटकिपरचा. केएल राहुलला मोहालीत कठीण जातं होतं तर इंदौरमध्ये इशान किशनकडे यष्टीरक्षण सोपवलं होतं. वर्ल्ड कपमध्ये केएल राहुलला यष्टीरक्षक म्हणून प्राधान्य दिलं जाणार असलं तरी आता राजकोटमध्ये तो काय करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत इशान किशन रोहित शर्मासोबत सलामीला उतरले. कोहली पुन्हा संघात आल्यानं श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. तर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल फलंदाजीला येईल. हार्दिक पांड्या बाहेर असल्यानं सूर्यकुमार यादव सहाव्या क्रमांकावर खेळेल.
भारताच्या गोलंदाजीत थोडासा बदल होऊ शकतो. वॉशिंग्टन सुंदरने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे रविंद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. तर कुलदीप यादवही खेळणार आहे. त्यामुळे दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटू अशी गोलंदाजांची फौज तिसऱ्या वनडेत उतरू शकते. मोहम्मद शमी तिसऱ्या वनडेत खेळणार नाहीय. त्यामुळे मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे.
advertisement
भारताचा संभाव्य प्लेइंग-11 संघ: रोहित शर्मा, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा/ वॉशिंगटन सुंदर, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2023 10:15 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : भारतासमोर पेच, अर्धा संघ 'आऊट'; रोहितसमोर प्लेइंग 11 निवडण्याचं आव्हान