Sachin On Dharmendra : 'तुमको देखकर एक किलो खून...', धर्मेंद्र ज्याला मुलगा म्हणायचे त्या सचिन तेंडूलकरची पोस्ट चर्चेत!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sachin Tendulkar On Dharmendra Death : तुमको देखकर एक किलो खून बढ जाता है मेरा, असं धर्मेंद्र म्हणायचे. त्यांच्या जाण्याने दु:ख झालंय, असं सचिन तेंडूलकर पोस्ट करत म्हणाला आहे.
Sachin Tendulkar Post On Dharmendra Death : बॉलिवूडच्या महान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र यांचं काल निधन झालं. धर्मेंद्र यांचं क्रिकेट जगतासोबतही खास नातं होतं. टीम इंडियाच्या एका महान क्रिकेटपटूवर धर्मेंद्र स्वतःच्या मुलाएवढंच प्रेम करत होते. धर्मेंद्र यांना क्रिकेटबद्दल विशेष आकर्षण होते. धर्मेंद्र महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला स्वतःचा मुलगा मानत होते. धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीमध्ये सचिन तेंडुलकरचा उल्लेख मुलगा म्हणून केला होता.
तुमको देखकर एक किलो खून बढाई है मेरा...
काही अभिनेते तुम्हाला लगेचच आवडतात आणि माझ्यासाठी ते धर्मेंद्र जी होते. ज्यांनी त्यांच्या बहुमुखी प्रतिभेने आमचे मनोरंजन केले. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा पडद्यावरील हे बंधन पडद्याबाहेर अधिक घट्ट झालं, असं सचिन म्हणतो. ते मला नेहमी म्हणायचे, तुमको देखकर एक किलो खून बढाई है मेरा... त्यांची ऊर्जा अविश्वसनीयपणे संसर्गजन्य होती, असंही सचिनने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement
सचिनची पोस्ट काय?
I, like many others, took an instant liking to Dharmendra ji, the actor, who entertained us with his versatility. That on-screen bond became stronger off-screen when I met him.
His energy was incredibly infectious, and he would always tell me, “Tumko dekhkar ek kilo khoon badh… pic.twitter.com/A8CmgR9WkW
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 24, 2025
advertisement
माझं हृदय जड झालंय...
धर्मेंद्र यांच्यात एक सहज प्रेम होते, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाला मौल्यवान आणि विशेष वाटायचे. त्यांचा चाहता नसणं अशक्य होतं. आज, त्यांच्या जाण्यानं माझं हृदय जड झालं आहे. ऐसा लगता है जैसे मेरा 10 किलो खून कम हो गया है. धर्मेंद्रजी तुमची आठवण येईल, असं सचिन तेंडूलकरने म्हटलं आहे.
advertisement
सचिन नेहमीच माझ्या लाडक्या मुलासारखा
दरम्यान, काही वर्षांपूर्वी धर्मेंद्र आणि सचिन तेंडुलकर यांनी एकदा विमानाने एकत्र प्रवास केला होता. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर केला होता. आम्ही विमानात अचानक भेटलो. सचिन नेहमीच मला माझ्या लाडक्या मुलासारखा राहिला आहे, असं धर्मेंद्र यांनी म्हटलं होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sachin On Dharmendra : 'तुमको देखकर एक किलो खून...', धर्मेंद्र ज्याला मुलगा म्हणायचे त्या सचिन तेंडूलकरची पोस्ट चर्चेत!


