advertisement

VIDEO : ''गौतम गंभीरचा टीम इंडियात एकच कैलाश जीवन'', संजय मांजरेकरची आतापर्यंतची सर्वात बोचरी टीका

Last Updated:

टीम इंडियाचा माजी खेळाडू संजय मांजरेकर याने ''गौतम गंभीरचा टीम इंडियात एकच कैलाश जीवन'' असल्याची टीका केली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

gautam gambhir
gautam gambhir
Gautam Gambhir News : टी20 वर्ल्डकप 2026 टीम इंडियाचा पुढचा सामना हा झिम्बाबे विरूद्ध आहे. हा सामना चेन्नईच्या मैदानावर 26 फेब्रुवारी 2026 ला खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक असणार आहे.कारण जर का हा सामना भारताने गमावला तर त्यांचा वर्ल्ड कपपर्यंतचा प्रवास संपु्ष्ठात येणार आहे. दरम्यान याआधी टीम इंडियाचा साऊथ आफ्रिकेने पराभव केला होता.या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू संजय मांजरेकर याने ''गौतम गंभीरचा टीम इंडियात एकच कैलाश जीवन'' असल्याची टीका केली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरं तर सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला होता. या पराभवानंतर टीम इंडियावर वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याच संकट घोगावत आहे.त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर आणि कोच गौतम गंभीरवर प्रचंड टीका होते आहे. गंभीरसोबत वॉशिग्टन सुंदरच्या खेळीवर देखील टीका होत आहे. या दरम्यान संजय मांजरेकर याने ''गौतम गंभीरचा टीम इंडियात एकच कैलाश जीवन'' असल्याची टीका केली आहे.
advertisement
advertisement
खरं तर कैलाश जीवन एक असं औषध आहे, जे जवळपास सगळ्याच रोगावर गुणकारी आहे. याचाच संदर्भ देत कैलाश जीवन करून एक औषध होतं. डोकं दुखलं तर ते लावा आणि पोटात काही त्रास झाला तर खायचं पण.त्यामुळे आमच्यावेळी सगळ्या समस्यांवर एकच औषध होतं. गौतम गंभीरचं देखील तसच आहे, त्याची पण प्रत्येक समस्येवर एकच औषध आहे ते म्हणजे वॉशिंग्टन सुंदर. कारण जर बॅटींगमध्ये काही समस्या जाणवली तर वॉशिंग्टन सुंदर आणि बॉलिंगमध्ये काही समस्या जाणवली तर वॉशिंग्टन सुंदरच,अशा शब्दात संजय मांजरेकर यांनी गौतम गंभीरवर सर्वात बोचरी टीका केली आहे. स्पोर्टस नेक्स्टमध्ये सूरू असलेल्या एका चर्चे दरम्यान संजय मांजरेकर बोलत होते. या चर्चेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
advertisement
दरम्यान साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात गौतम गंभीरने वॉशिंग्टन सुंदरला चौथ्या क्रमांकावर खेळवले होते. मात्र त्याला गंभीरने ज्या विश्वासाने मैदानात पाठवलं त्याप्रमाणे तो खेळी करू शकला नाही. त्याच्याऐवजी रिंकू सिंहला पाठवायला हवं होतं. कारण रिंकू सिंह अशा परिस्थितीत चांगली फलंदाजी करू शकला असता.त्यामुळे गंभीरच्या याच निर्णयावर प्रचंड टीका होते आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : ''गौतम गंभीरचा टीम इंडियात एकच कैलाश जीवन'', संजय मांजरेकरची आतापर्यंतची सर्वात बोचरी टीका
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement