Shashank singh : छाती ठोकून सांगणाऱ्या शशांक सिंगची आणखी एक भविष्यवाणी, IPL 2026 कोण जिंकणार? स्पष्टच सांगितलं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shashank singh Prediction On IPL 2026 : क्रिकेटचा नवा ज्योतिषी ठरणाऱ्या शशांक सिंगने आगामी आयपीएल हंगामावर मोठी भविष्यवाणी केली आहे.
Shashank Singh Bold Prediction : पंजाब किंग्जचा (PBKS) स्टार फलंदाज शशांक सिंग यंदाच्या आयपीएलमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. फलंदाजीमध्ये त्याने चमकदार कामगिरी केलीच, पण एका भविष्यवाणीने शशांक प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आयपीएल फायनल सामन्यात शशांकने पूर्ण ताकदीनिशी खेळताना अखेरच्या बॉलपर्यंत सामना नेला आणि सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकवले होते. शशांक आता लवकर टीम इंडियामध्ये देखील खेळताना दिसू शकतो. अशातच आता शशांकने आणखी एक मोठं वक्तव्य केलंय.
आम्ही बंगळूरुमध्ये फायनल खेळणार अन्... - शशांक सिंग
पंजाब किंग्जचा (PBKS) स्टार फलंदाज शशांक सिंगने केलेल्या एका विधानामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. आयपीएल 2025 च्या आधी त्याने केलेली 'टॉप 2' मध्ये पोहोचण्याची भविष्यवाणी खरी ठरल्याने, आता त्याच्या ताज्या वक्तव्याकडे क्रिकेट चाहते लक्ष देऊन आहेत. शशांकने स्पष्टपणे म्हटले आहे की, "पुढच्या वर्षी आम्ही फायनल बंगळूरुमध्ये नक्की खेळणार आहोत आणि पंजाब किंग्ज ट्रॉफीही उचलू."
advertisement
शशांकची मोठी भविष्यवाणी
शशांक सिंगने आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, पंजाब किंग्ज यंदाच्या सिझनमध्ये टॉप 2 मध्ये स्थान मिळवेल, जे त्याने 14 मॅचनंतर करून दाखवले. पंजाबने 11 वर्षांनंतर टॉप 2 मध्ये स्थान मिळवून इतिहास रचला. आता फायनलनंतर त्याने पुढच्या वर्षासाठी ही मोठी भविष्यवाणी केली आहे.
advertisement
advertisement
भविष्यवाणी खरी ठरणार का?
दरम्यान, जर खरोखरच पुढील वर्षी पंजाब किंग्ज फायनल बंगळूरुमध्ये खेळली आणि ट्रॉफी जिंकली, तर शशांक सिंगला 'क्रिकेटचा ज्योतिषी' म्हणून ओळखले जाईल यात शंका नाही! त्याची ही नवीन भविष्यवाणी खरी ठरते का, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
पंजाब किंग्जने यंदाच्या आयपीएल 2025 मध्ये अप्रतिम कामगिरी करत गुणतालिकेत टॉप 2 मध्ये स्थान पटकावले आहे. 11 वर्षांनंतर त्यांनी हे यश संपादन केले असून, ही त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक कामगिरी आहे. संपूर्ण संघाने केलेल्या सातत्यपूर्ण आणि अथक प्रयत्नांचे हे फळ आहे. आता सर्वांच्या नजरा पुढील वर्षीच्या कामगिरीवर लागल्या आहेत, जिथे ते फायनल खेळून ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांची ही वाटचाल पाहता, पंजाब किंग्जने यंदाच्या सिझनमध्ये एक मजबूत दावेदार म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
Location :
Punjab
First Published :
June 10, 2025 12:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shashank singh : छाती ठोकून सांगणाऱ्या शशांक सिंगची आणखी एक भविष्यवाणी, IPL 2026 कोण जिंकणार? स्पष्टच सांगितलं!