Shikhar Dhawan : निवृत्तीच्या 2 दिवसांमध्येच शिखर धवनचा मोठा निर्णय, आता या T20 लीगमध्ये खेळणार गब्बर!
- Published by:Shreyas
Last Updated:
भारतीय क्रिकेटमध्ये जवळपास दीड दशकं धमाका केल्यानंतर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 38 वर्षांच्या शिखर धवनने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.
मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये जवळपास दीड दशकं धमाका केल्यानंतर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 38 वर्षांच्या शिखर धवनने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. निवृत्तीच्या दोन दिवसांमध्येच शिखर धवनने लिजेंड्स लीग क्रिकेट (एलएलसी) मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. एलएलसी खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता धवनला आयपीएल वगळता जगातल्या इतर टी-20 लीगमध्येही सहभागी होता येणार आहे.
'मी अजूनही खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. पण मी माझ्या निर्णयाबाबत समाधानी आहे. क्रिकेट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता आणि कायमच राहिल. मी माझ्या क्रिकेटमधल्या मित्रांसोबत पुन्हा जोडला जाऊ इच्छित आहे. चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी मी इच्छुक आहे. आम्ही नव्या आठवणी बनवू', असं शिखर धवन म्हणाला आहे.
2010 साली शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2013 साली त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच 187 रनची खेळी करून रेकॉर्ड केलं होतं. धवनने 34 टेस्ट, 167 वनडे आणि 68 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 12,286 रन केले. 2022 साली धवन भारताकडून शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर महिन्यात खेळवली जाणार आहे.
advertisement
आयपीएलमध्ये घडवला इतिहास
शिखर धवनने 2020 सालच्या आयपीएलमध्ये लागोपाठ दोन सामन्यांमध्ये शतक करून इतिहास घडवला होता. आयपीएलच्या इतिहासात तो अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक फोर मारण्याचा विक्रमही शिखर धवनच्याच नावावर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2024 6:32 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan : निवृत्तीच्या 2 दिवसांमध्येच शिखर धवनचा मोठा निर्णय, आता या T20 लीगमध्ये खेळणार गब्बर!