Yashasvi Jaiswal : 'गिलवर किती दिवस प्रेम करणार', जयस्वालने जयपूरमधून दिलं ऑस्ट्रेलियात बसलेल्या गंभीरला उत्तर!

Last Updated:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल संघर्ष करत आहे. गिलसाठी टीम इंडियातल्या दोन स्टार खेळाडूंचा बळी गेला आहे.

'गिलवर किती दिवस प्रेम करणार', जयस्वालने जयपूरमधून दिलं ऑस्ट्रेलियात बसलेल्या गंभीरला उत्तर!
'गिलवर किती दिवस प्रेम करणार', जयस्वालने जयपूरमधून दिलं ऑस्ट्रेलियात बसलेल्या गंभीरला उत्तर!
जयपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल संघर्ष करत आहे. गिलसाठी टीम इंडियातल्या दोन स्टार खेळाडूंचा बळी गेला आहे. आशिया कपमध्ये शुभमन गिलचं टीम इंडियात कमबॅक झालं, एवढच नाही तर त्याला टीमचं उपकर्णधारही करण्यात आलं. टीममध्ये कमबॅक झाल्यानंतर गिलला ओपनिंगची जबाबदारी देण्यात आली, यासाठी टीमचा रेग्युलर ओपनर संजू सॅमसन याला मिडल ऑर्डरमध्ये खेळवण्यात आलं, पण संजूलाही मिडल ऑर्डरमध्ये संघर्ष करावा लागत आहे.
अखेर तिसऱ्या टी-20 सामन्यातून संजू सॅमसनला टीमबाहेर केलं गेलं, पण गिलला मात्र अजूनही सूर गवसलेला नाही. मागच्या 10 इनिंगमध्ये गिलचा स्कोअर 20*, 10, 5, 47, 29, 4, 12, 37*, 5 आणि 15 एवढा आहे. एवढच नाही तर जुलै 2024 पासून गिलला टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये अर्धशतकही करता आलेलं नाही.

जयस्वालचं गंभीरला उत्तर

advertisement
शुभमन गिलला वारंवार संधी मिळत असताना संजूला बेंचवर बसावं लागत आहे, तर यशस्वी जयस्वालची भारताच्या टी-20 टीममध्ये निवडही होत नाहीये, पण जयस्वालने त्याच्या बॅटनेच उत्तर दिलं आहे. राजस्थानविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात जयस्वालने दुसऱ्या इनिंगमध्ये 156 रन केले. 174 बॉलमध्ये केलेल्या या खेळीमध्ये जयस्वालने 18 फोर आणि एक सिक्स लगावली. जयस्वालच्या या खेळीमुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईला हा सामना ड्रॉ करण्यात यश आलं. याआधी पहिल्या इनिंगमध्येही जयस्वालने 67 रन केले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : 'गिलवर किती दिवस प्रेम करणार', जयस्वालने जयपूरमधून दिलं ऑस्ट्रेलियात बसलेल्या गंभीरला उत्तर!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement