Asia Cup 2025 : टीम इंडियात मोठी घडामोड, आशिया कपमध्ये होणार खांदेपालट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची टेस्ट मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्यानंतर आता टीम इंडियाने आशिया कपची तयारी सूरू केली आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरूवात होणार आहे.
Asia Cup 2025 : इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची टेस्ट मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्यानंतर आता टीम इंडियाने आशिया कपची तयारी सूरू केली आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी टीम इंडियात मोठ्या घडामोड सूरू आहेत. त्यामुळे आता संघात मोठी खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
खरं तर आशिया कपमध्ये टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे.सुर्यकुमार यादवची अलिकडेच हर्नियाची शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेतून तो बरा झाला आणि त्याने आशिया कपसाठी सरावही सूरू केला आहे.
दरम्यान या स्पर्धेत शुभमन गिलच्या खेळण्यावरून मोठा प्रश्नचिन्ह होता. कारण आशिया कपमध्ये अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीला उतरण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीत शुभमन गिलला खेळवायचे की नाही असा मोठा प्रश्न होता. तसेच तो भारताने जिंकलेल्या 2024च्या टी20चाही भाग नव्हता.त्यामुळे त्याला टी20 सारख्या छोट्या स्पर्धेत खेळवायचे का? याचा विचार सूरू आहे.
advertisement
पण इंग्लंड विरूद्ध टेस्ट मालिकेत कॅप्टन शुभमन गिलच्या नेतृत्वातील संघाची कामगिरी पाहता आता त्याचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे.कारण शुभमन गिलला आशिया कपसाठी उपकर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे. खरं तर इंग्लंड विरूद्धच्या कामगिरीनंतर शुभमन गिलने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये मोठी खळबळ माजवली आहे.शुभमन गिल नवा उभरता लीडर म्हणून समोर येताना दिसत आहे.त्यामुळेच त्याच्यावर आशिया कपसाठी उपकर्णधाराची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
या दरम्यान गिलला त्याच्या आयपीएलचा अनुभवही कामी येणार आहे.शुभमन गिल आयपीएलच्या तीन यशस्वी हंगामांनंतर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गिलने 2023,2024 आणि 2025 मध्ये अनुक्रमे 157.80 च्या स्ट्राईक रेटने 890, 147.40 च्या स्ट्राईक रेटने 426 आणि 155.88च्या स्ट्राईक रेटने 650 धावा केल्या होत्या. तर गेल्या दोन हंगामात तो कर्णधारही होता. यामुळे भारतीय निवडकर्त्यांना लहान स्वरूपात त्याच्याबद्दल पुनर्विचार करावा लागला.
advertisement
रोहितच कर्णधारपद खेचून घेणार
अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी मालिका संपल्यापासून टेस्ट कर्णधार शुभमन गिलला वनडेच कर्णधारपद देण्याबाबत विचार सूरू झाला आहे. सध्या रोहित शर्मा हा वनडेचा कर्णधार आहे. त्याचं आगामी 2027 चा आयसीसीची वर्ल्डकप खेळण्यावर लक्ष्य आहे. पण ज्या प्रमाणे शुभमन गिलच्या अवती भवती ड्रेसिंग रूममध्ये घडामोडी घडतायत.ते पाहता रोहित शर्माचं वनडेच कर्णधारपदही धोक्यात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 10, 2025 5:16 PM IST