Employee and Boss Affair : कर्मचाऱ्यावर जडलं प्रेम, महिला बॉसने त्याच्या घटस्फोटाची रक्कमही भरली आणि कहाणीमध्ये ट्वीस्ट, जगभर झाली चर्चा

Last Updated:

Employee and Boss Affair : या घटनेमध्ये चांगलाच मसाला असल्यामुळे ही चर्चा सोशल मीडियाच्या सगळ्याच प्लॅटफॉर्मवर इतकी गाजली की आता ती संपूर्ण जगाला माहित झाली आहे.

AI generated Photo
AI generated Photo
मुंबई : नातेसंबंध आणि पैशांची गुंतवणूक कधी कधी इतकी गुंतागुंतीची होते की शेवटी तिचा शेवट न्यायालयात होतो. प्रेम, आकर्षण, विवाह, अफेअर आणि शेवटी पैशांचा वाद. या सगळ्याचं मिश्रण झालं तर परिस्थिती तर आणखीच हाताबाहेर जाते आणि ते एका हायवोल्टेज ड्रामामध्ये कन्वर्ट होतं. अशाच एका वेगळ्या प्रकरणाने अलीकडे चर्चेत स्थान मिळवलं आहे.
या घटनेमध्ये चांगलाच मसाला असल्यामुळे ही चर्चा सोशल मीडियाच्या सगळ्याच प्लॅटफॉर्मवर इतकी गाजली की आता ती संपूर्ण जगाला माहित झाली आहे.
या घटनेमध्ये एका महिला उद्योजिकेने आपल्या कनिष्ठ सहकर्मचाऱ्याच्या प्रेमात पडून मोठा आर्थिक धोका पत्करला.
खरंतर एक महिला एक स्टार्टअप कंपनी चालवते. तेथील एक एम्प्लॉइच्या प्रेमात ती महिला पडली. पण यात अडचण अशी की ते दोघेही विवाहित होते. पण त्यांनी कशाचीही परवा न करता आपलं नातं पुढे नेलं आणि अखेर आपला नवरा आणि बायकोला सोडाचं असा निर्णय त्या दोघांनी घेतला.
advertisement
आश्चर्य म्हणजे त्या महिला बॉसने आपल्या नवऱ्याकडून कोट्यवधी रुपये पोटगी घेतली जी तिने तिच्या बॉयफ्रेंडला दिली आणि त्याने ही रक्कम आपल्या बायकोला पोटगी म्हणून घटस्फोटानंतर दिली. पण नंतर त्यांच्या नात्यात एक भलताच ट्वीस्ट आला आणि सगळं बिघडलं. त्यानंतर हे प्रकरणं इतकं गुंतागुंतीचं झालं की सगळेच गोंधळले आहेत.
advertisement
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की असं काय घडलं?
खरंतर हे प्रकरण चीनमधील आहे, जे सोशल मीडिया आणि तेथील स्थानिक मीडियाकडून समोर आलं आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, झू नावाची महिला चोंगकिंगमध्ये एक स्टार्टअप कंपनी चालवते. त्यांच्या कंपनीत हे नावाचा एक कर्मचारी काम करत होता. हळूहळू झू त्याच्याकडे आकर्षित झाल्या. विशेष म्हणजे त्या काळात दोघेही विवाहित होते. मात्र, कामाच्या ठिकाणी सुरू झालेलं नातं अफेअरमध्ये बदललं. इतकंच नव्हे तर, दोघांनीही आपल्या जोडीदारांना सोडून एकत्र राहण्याची योजना आखली.
advertisement
झू यांनी हे याला पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी मदत म्हणून तब्बल ३० लाख युआन (भारतीय रूपयांत कोटींच्या घरात) दिले. ही रक्कम थेट हेनं चेन म्हणजे आपल्या बायकोला पाठवली होती. कारण, घटस्फोटानंतर मुलाच्या संगोपनासाठी आणि तिच्या देखभालीसाठी हा पैसा वापरता येईल, असा उद्देश होता.
सगळं सेट झाल्यानंतर हे आणि झू ऐकत्र राहू लागले. सुरुवातीला सगळं ठिक वाटत होतं पण नंतर त्यांच्यात वाद इतका वाढला की वर्षभरातच त्यांचं नातं पूर्णपणे ढासाळलं आणि ते एकमेकांपासून दूर झाले. त्यांनी एकमेकांसाठी आपल्या पहिल्या जोडीदाराची फसवणूक केली होती, पण आता त्यांचं नातंच फार काळ टिकलं नाही, जे खूपच वाईट घडलं.
advertisement
पण खरा ट्वीस्ट पुढे आहे. नातं संपल्यानंतर झू यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि दिलेली रक्कम परत मिळावी अशी मागणी केली. सुरुवातीच्या खटल्यात न्यायालयाने झू यांच्या बाजूने निर्णय दिला होता. मात्र तोपर्यंत हे आणि त्याची पहिली पत्नी चेन पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी हे पैसे परत न करण्याचा निर्णय घेतला.
हे आणि त्याची बायको चेन यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केली. या वेळी न्यायालयाने वेगळा निर्णय दिला. न्यायालयाने नमूद केले की, झू यांनी रक्कम "भेट" म्हणून दिली होती, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे नाहीत. उलट, ही रक्कम हेच्या घटस्फोटासाठी आणि त्याच्या मुलाच्या संगोपनासाठी मुआवजा म्हणून दिली गेल्याचे स्पष्ट झालं. त्यामुळे आता ही रक्कम हे ची नाही तर चिन ची आहे. त्यामुळे ती परत केली जाऊ शकत नाही असं न्यायालयानं सांगितलं.
advertisement
आता झू तर तिच्या नवऱ्यापासून वेगळी झाली, पण चीन आणि हे मात्र पुन्हा मुलासाठी एकत्र आले आणि आता झूचे पैसे वापरुन ते आपल्या मुलाचं संगोपण करत आहेत.
ही कहाणी खूपच गुंतागुंतीची आहे. शिवाय आपल्यासाठी एक उदाहरण देखील आहे की जेव्हा आपण कोणा तिसऱ्यासाठी आपलं हसतं खेळतं आयुष्य संपवतो तेव्हा ते कोणालाच सुखी राहू देत नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Employee and Boss Affair : कर्मचाऱ्यावर जडलं प्रेम, महिला बॉसने त्याच्या घटस्फोटाची रक्कमही भरली आणि कहाणीमध्ये ट्वीस्ट, जगभर झाली चर्चा
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement