IND vs SA : गुवाहाटी कसोटीतून शुभमन गिल बाहेर, BCCI ने केली नव्या कॅप्टनची घोषणा! पण एक चूक केली
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rishabh Pant will lead India in Guwahati : गिलच्या अनुपस्थितीत विकेटरकीपर फलंदाज ऋषभ पंत दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करेल.
WTC च्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या असलेल्या भारत आणि साऊथ अफ्रिका कसोटी मालिकेतून वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिलला (Shubman Gill ruled out of 2nd Test) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्या दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचमधून बाहेर पडावं लागलं आहे. गुवाहाटी येथे होणाऱ्या या दुसऱ्या सामनात गिल सहभागी होऊ शकणार नाही, अशी महिती बीसीसीआयने दिली आहे.
शुभमन गिल पूर्णपणे फिट नाही
गिलला कोलकात्यामधील पहिल्या कसोटी मॅचच्या दुसऱ्या दिवशी मानेला दुखापत झाली होती. दुसऱ्या दिवसाचा सामना संपल्यानंतर त्याला तातडीने तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळाला आणि 19 नोव्हेंबर रोजी तो गुवाहाटीला रवाना झाला होता. मात्र, दुर्दैवाने, दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचसाठी तो पूर्णपणे फिट होऊ शकला नाही.
advertisement
ऋषभ पंतकडे टीम इंडियाची कॅप्टन्सी
शुभमनच्या दुखापतीचे पुढील मूल्यांकन करण्यासाठी गिल आता मुंबईला जाणार आहे. गिलच्या अनुपस्थितीत विकेटरकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant will lead India in Guwahati ) दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करेल, असं बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे. पण टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटणार का? असा सवाल विचारला जात आहे. कारण शुभमनच्या जागेवर कुणाचीही रिप्लेसमेंट जाहीर करण्यात आलेली नाही.
advertisement
Update #TeamIndia captain Shubman Gill, who suffered a neck injury during the first Test against South Africa, has been ruled out of the second Test in Guwahati.
Rishabh Pant will lead the team in the 2nd Test in his absence.
Details | #INDvSA | @IDFCFIRSTBank…
— BCCI (@BCCI) November 21, 2025
advertisement
टीम इंडियाला वन डाऊनला म्हणजेच मीडल ऑर्डरमध्ये संयमी आणि तंत्रिकदृष्ट्या योग्य फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे शुभमन गिलच्या जागेवर राईट हँडर फलंदाज हवा होता, असं मत तज्ज्ञांनी मांडलं होतं. अशातच बीसीसीआयने कोणतीही घोषणा केली नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
साऊथ अफ्रिका 1-0 ने आघाडीवर
दरम्यान, पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात काहीही करून जिंकावं लागणार आहे. सध्या साऊथ अफ्रिका या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असल्याने टीम इंडियासाठी आगामी सामना करो या मरो असा असणार आहे. आता ऋषभच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया कशी कामगिरी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 12:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : गुवाहाटी कसोटीतून शुभमन गिल बाहेर, BCCI ने केली नव्या कॅप्टनची घोषणा! पण एक चूक केली


