IND vs SA 2nd Test : 'तुला आराम हवा असेल तर...', गौतम गंभीरने शुभमन गिलला दिला अजब सल्ला, आशिष नेहराला लागला ठसका!

Last Updated:

Gautam Gambhir On Shubhman workload management : गंभीर याने शुभमन गिलला स्पष्ट शब्दांत सांगितलं की, जर त्याला विश्रांतीची गरज असेल, तर त्याने थेट आयपीएलमधून बाजूला व्हावं.

Gautam Gambhir gives advice to shubhman gill
Gautam Gambhir gives advice to shubhman gill
Gautam Gambhir gives advice Skip IPL : रोहित शर्मा याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर आता वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिल टीम इंडियाची जबाबदारी सांभाळत आहे. वनडे आणि कसोटी मालिका एकामागून एक असल्याने शुभमन गिलला घरी जाण्यासाठी वेळ मिळत नाहीये. अशातच आता शुभमनच्या वर्क लोड मॅनेजमेंटचा मुद्दा ऐरणीवर आलाय. अशातच गौतम गंभीरने शुभमनला असा काही सल्ला दिलाय की तिकडे आशिष नेहराला नारळपाणी पिता पिता ठसका लागलाय.

जर त्याला विश्रांतीची गरज असेल, तर...

टीम इंडियाचे मुख्य कोच गौतम गंभीर यांनी वर्कलोड मॅनेजमेंटच्या कल्पनेला थेटपणे फेटाळून लावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यापूर्वी दरम्यान, जिओ हॉटस्टार एक्सपर्ट आकाश चोप्राने गौतम गंभीर याच्याशी या विषयावर चर्चा केली. तेव्हा गंभीर याने शुभमन गिलला स्पष्ट शब्दांत सांगितलं की, जर त्याला विश्रांतीची गरज असेल, तर त्याने थेट आयपीएलमधून बाजूला व्हावं. पण टीम इंडियाच्या सामन्यांमधून विश्रांती घेऊ नको.
advertisement

....तर कॅप्टनसी करू नका

आकाश चोप्रा यांनी या प्रसंगाबद्दल बोलताना सांगितलं की, "मी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी गौतमला हा प्रश्न विचारला होता. त्याचे म्हणणे एकदम स्पष्ट होतं की, जर तुम्हाला वर्कलोड मॅनेजमेंट हवे असेल, तर आयपीएल सोडून द्या." गंभीर यांनी पुढं सांगितलं, जर आयपीएल टीमचे कॅप्टनपद स्वीकारल्यामुळे तुमच्यावर खूप प्रेशर येत असेल, तर कॅप्टनसी करू नका. पण भारतासाठी मॅच खेळताना, जर तुम्ही पूर्णपणे फिट असाल, तर मानसिकरित्या थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं गंभीर म्हणाला होता.
advertisement

गुजरात टायटन्सला मोठा धक्का

दरम्यान, शुभमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सची कॅप्टन्सी करतो. तर आशिष नेहरा गुजरातचा हेड कोच आहे. अशातच आता गंभीरच्या निर्णयामुळे गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे आता शुभमन गिल कोणता निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 2nd Test : 'तुला आराम हवा असेल तर...', गौतम गंभीरने शुभमन गिलला दिला अजब सल्ला, आशिष नेहराला लागला ठसका!
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement