World Cup : वर्ल्ड कपसाठी लंकेने घेतली रिस्क, संघात दुखापत झालेले दोन फिरकीपटू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, हसारंगा, तीक्ष्णा आणि दिलशान मधुशंका यांना संघात घेतलं आहे. पण हे तंदुरुस्त झाले तरच खेळू शकणार आहेत.
कोलंबो, 26 सप्टेंबर : भारतात ५ ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी श्रीलंकेने १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. दुखापत झालेल्या खेळाडूलाही श्रीलंकेने संधी दिली आहे. दुखापतीने त्रस्त असलेला फिरकीपटू वानिंदु हसारंगा आणि महीश तीक्ष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुशन हेमंता आणि चमिका करूणारत्ने यांना राखीव खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलंय. संघाचा कर्णधार दासुन शनाका असेल तर उपकर्णधारपद कुशल मेंडिसकडे सोपवण्यात आलं आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, हसारंगा, तीक्ष्णा आणि दिलशान मधुशंका यांना संघात घेतलं आहे. पण हे तंदुरुस्त झाले तरच खेळू शकणार आहेत. श्रीलंकेच्या संघात दिमुथ करुणारत्ने, दुनिथ वेल्लालागे, कसुन राजिथा, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा यांचाही समावेश आहे. वेल्लालागेने आशिया कपमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात ६ विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
advertisement
Sri Lanka 15 member squad for the ICC Cricket World Cup 2023 announced.
Dasun Shanaka will captain SL while Kusal Mendis is appointed as the Vice Captain.
Wanindu Hasaranga, Maheesh Theekshana & Dilshan Madushanka are subject to fitness.#LKA #SriLanka #CWC23 #WorldCup2023… pic.twitter.com/RI0TZiHyxT— Sri Lanka Tweet (@SriLankaTweet) September 26, 2023
advertisement
वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), वानिंदु हसारंगा, महीश तीक्ष्णा, दिलशान मधुशंका, पथुम निसांका, कुसल जेनिथ, दिमुथ करुणारत्ने, चरित असालंका, धनंजय डिसिल्वा, सदीरा समरविक्रमा, दुनिथ वेल्लालागे, कसुन राजिथा, मथीशा पथिराना आणि लाहिरू कुमारा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2023 1:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup : वर्ल्ड कपसाठी लंकेने घेतली रिस्क, संघात दुखापत झालेले दोन फिरकीपटू