'सनरायजर्स हैदराबाद'ची मालकीण काव्या मारनने बदललं टीमचं नाव, आता या नावासह मैदानात उतरणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएलमधल्या सनरायजर्स हैदराबाद फ्रॅन्चायजीची मालकिण काव्या मारनने टीमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आयपीएलमधल्या सनरायजर्स हैदराबाद फ्रॅन्चायजीची मालकिण काव्या मारनने टीमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. काव्या मारनने आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद नाही तर द हंड्रेड लीगमधल्या नॉर्दन सुपरचार्जर्सचं नाव बदललं आहे. काव्या मारनने द हंड्रेडमध्ये खेळणाऱ्या तिच्या टीमचं नाव आता सनरायजर्स लीड्स ठेवलं आहे. 2026 साली सुरू होणाऱ्या द हंड्रेडच्या मोसमाआधी नॉर्दन सुपरचार्जर्सचं नाव बदललं जाईल, अशा बातम्या आधीच प्रसिद्ध झाल्या होत्या, आता या बातम्यांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
नॉर्दन सुपरचार्जर्स नाही, आता सनरायजर्स लीड्स
चेन्नईमधील भारतीय मीडिया ग्रुप असलेल्या सन ग्रुपने या वर्षाच्या सुरूवातीला नॉर्दन सुपरचार्जर्सला 1155 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. यॉर्कशायरने ECB च्या 49 टक्के हिस्सेदारीशिवाय सुपरचार्जर्सला त्यांची 51 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे सन ग्रुपकडे कंपनीचे 100 टक्के शेअर्स आहेत. नॉर्दन सुपरचार्जर्स लीड्समधील फ्रॅन्चायजी आहे.
advertisement
The company formerly known as Northern Superchargers has officially become Sunrisers Leeds
One of three likely name changes in the Hundred for 2026, along with Manchester Super Giants and MI London pic.twitter.com/bVSXnyxKAe
— Matt Roller (@mroller98) November 4, 2025
advertisement
IPL आणि SA20 प्रमाणेच द हंड्रेडमध्येही सनरायजर्स
काव्या मारनच्या सन ग्रुपकडून नव्या नावाबद्दल लीड्समधील कंपनीज हाऊसमध्ये कागदपत्र जमा केली गेली आहेत, त्यामुळे आता सुपरचार्जर्स नाव यापुढे वापरलं जाणार नाही. त्याऐवजी टीमचं नवीन नाव सनरायजर्स लीड्स असेल. काव्या मारनच्या आयपीएल टीमचं नाव सनरायजर्स हैदराबाद आणि SA20 मध्ये सनरायजर्स इस्टर्न केप आहे.
advertisement
आणखी दोन टीमची नाव बदलणार
द हंड्रेड खेळणाऱ्या 8 टीममध्ये नॉर्दन सुपरचार्जर्स तिसरी टीम आहे, जिचं नाव बदललं जाणार आहे. मॅनचेस्टर ओरिजिनल्सचं नाव बदलून मॅनचेस्टर सुपर जाएंट्स केलं जाणार आहे. तसंच ओव्हल इनव्हिन्सिबलचं नाव बदलून मुंबई इंडियन्स लंडन केलं जाईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'सनरायजर्स हैदराबाद'ची मालकीण काव्या मारनने बदललं टीमचं नाव, आता या नावासह मैदानात उतरणार!


