IPL 2025 : हैदराबाद जिंकली पण फायदा मुंबईचा झाला, हार्दिक समोर उरला एकच स्पर्धक, चौथ्या स्थानी कोण बाजी मारणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लखनऊ सुपर जाएंटस प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे लखनऊच्या पराभवाने मुंबईच्या जीवात जीव आला आहे.
SRH vs LSG : आयपीएल 2025च्या आजच्या सामन्यात प्लेऑफमधून बाहेर झालेल्या सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएंटसने 6 विकेटने पराभव केला आहे. या पराभवासह लखनऊ सुपर जाएंटस प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे लखनऊच्या पराभवाने मुंबईच्या जीवात जीव आला आहे.
खरं गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे तीन संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहे.आता चौथी टीम कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौथ्या जागेसाठी मुंबई इडियन्स, लखनऊ सूपर जाएटस आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात स्पर्धा सूरू होती. पण आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएंटसचा पराभव केला आहे.या पराभवामुळे लखनऊ सुपर जाएंटस प्लेऑफमधून बाहेर झाली आहे.त्यामुळे आता प्लेऑफच्या चौथ्या जागेसाठी दोन टीम उरल्या आहेत.त्यामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
लखनऊ बाहेर झाल्यानंतर आता चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ उरले आहेत. दोन्ही संघाचे दोन दोन सामने उरले आहेत. जर मुंबईने त्यांचे दोनही सामने जिंकले तर प्लेऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरणार आहे. त्याचसोबत जर दिल्ली कॅपिटल्सने एक जरी सामना गमावला तरी ते प्लेऑफमधून बाहेर होण्याची शक्यता आहे.
advertisement
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई, दिग्वेश सिंग राठी, विल्यम ओरूरके
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन (w), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, हर्ष दुबे, झीशान अन्सारी, एशान मलिंगा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 19, 2025 11:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : हैदराबाद जिंकली पण फायदा मुंबईचा झाला, हार्दिक समोर उरला एकच स्पर्धक, चौथ्या स्थानी कोण बाजी मारणार?