IND vs SL : वडिलांच्या निधनाने खचलेल्या 22 वर्षाच्या वेल्लालागेला सूर्याने दिली 'जादू की झप्पी', पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav hugs Dunith Wellalage : टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यानंतर दुनिथ वेल्लालागे याची भेट घेतली अन् जादू की झप्पी दिली.
India vs Srilanka : अशिया कपमधील सुपर फोरचा (Asia Cup Super 4) अखेरचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळवला. अशातच सामना झाल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने असं काही केलं की, सर्वांचं मन भरुन आलं. सूर्याने श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage) याची भेट घेतली अन् सांत्वन केलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वेल्लालागेच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका
अशिया कपमधील अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यावेळी श्रीलंकेचा स्टार स्पिनर दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage Father Passes Away) याच्या वडिलांचं निधन झालं होतं. 18 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धचा ग्रुप बीची मॅच सुरू असताना वेल्लालागे याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यांचा जीव वाचवता आला नव्हता.
advertisement
सूर्याने जादूकी झप्पी दिली
या घटनेनंतर वेल्लालागे तातडीने श्रीलंकेला रवाना झाला होता. अशातच आता टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने सामना झाल्यावर वेल्लालागे याची मैदानावर भेट घेतली आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. सूर्याने वेल्लालागे याचा कॉन्फिडेन्स वाढावा यासाठी काही मोलाचे सल्ले दिले. त्यानंतर सूर्याने त्याला जादूकी झप्पी दिली. त्यानंतर वेल्लालागे याच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचं दिसून आलं.
advertisement
पाहा Video
Suryakumar Yadav met Dunith Wellage after the match
- Dunath's father passed away during last week. pic.twitter.com/Y9llfh6v38
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2025
श्रीलंकन फॅन्स स्टेडियममध्ये उपस्थित
दरम्यान, श्रीलंकेने अफगाणिस्तानविरुद्ध 170 धावांचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर थोड्याच वेळात दुनिथला त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तो श्रीलंकेला रवाना झाला होता. तसेच दोन दिवसानंतर तो पुढची मॅच खेळण्यासाठी लगेच माघारी देखील आला होता. त्यानंतर त्याला सपोर्ट करण्यासाठी असंख्य श्रीलंकन फॅन्स स्टेडियममध्ये उपस्थित होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 10:52 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SL : वडिलांच्या निधनाने खचलेल्या 22 वर्षाच्या वेल्लालागेला सूर्याने दिली 'जादू की झप्पी', पाहा Video