राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट सांगितलं
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधक करत आहे.
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधक करत आहे.अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, अमित शाह आणि पीएम मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.
ओला दुष्काळ जाहीर करणार का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओला दुष्काळाबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं त्यांनी म्हंटलं आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पूरस्थिती, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि पुनर्वसनाची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली. फडणवीस यांनी केंद्राकडे लवकरच अधिकृत प्रस्ताव सादर केला जाईल, असेही स्पष्ट केले. या प्रस्तावाच्या आधारे केंद्र सरकार महाराष्ट्राला आर्थिक सहाय्य देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
advertisement
दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान मोदींसमोर सादर करण्यात आलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनात अतिवृष्टीमुळे राज्यभर झालेल्या हानीचे तपशीलवार वर्णन आहे. पिकांच्या नुकसानीसोबतच रस्ते, पूल, शाळा आणि घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांना सांगितले की, लाखो शेतकरी पिकांच्या नुकसानीमुळे संकटात सापडले आहेत. त्यांना तातडीची आर्थिक मदत मिळणे अत्यावश्यक आहे. “राज्यातील शेतकऱ्यांना थेट खात्यात आर्थिक मदत देण्याचा विचार आम्ही करत आहोत. त्यासाठी केंद्राकडून भरीव मदत मिळणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेदरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार ठामपणे उभे राहील, असे आश्वासन दिले. त्यांनी शक्य तितक्या लवकर मदतीचा निर्णय होईल, असे सांगितले.
राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे केवळ पिकांचेच नाही तर गुरेढोरांचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत. या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर होईल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 10:49 AM IST