advertisement

T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच ICC ने शेड्यूल बदललं, आता कुठे होणार सेमी फायनल?

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपचा सुपर-8 राऊंड सध्या सुरू आहे. सुपर-8 नंतर दोन सेमी फायनल आणि एक फायनल सामना खेळवला जाणार आहे.

T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच ICC ने शेड्यूल बदललं, आता कुठे होणार सेमी फायनल?
T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच ICC ने शेड्यूल बदललं, आता कुठे होणार सेमी फायनल?
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपचा सुपर-8 राऊंड सध्या सुरू आहे. सुपर-8 नंतर दोन सेमी फायनल आणि एक फायनल सामना खेळवला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊट स्टेजआधी आयसीसीने वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत, पण सेमी फायनलला कोणत्या टीम पोहोचतात, यावरही हे बदल अवलंबून असणार आहेत.
आयसीसीने सेमी फायनलच्या सामन्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. श्रीलंकेची टीम सेमी फायनलमध्ये पोहोचली तर त्यांचा सामना आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे, त्यामुळे श्रीलंका सेमी फायनलला क्वालिफाय झाली तर त्यांना ही मॅच त्यांच्या घरच्या मैदानात खेळता येईल. टी-20 वर्ल्ड कपची स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत आहे, त्यामुळे सेमी फायनलचा एक सामना कोलकाता किंवा मुंबईशिवाय कोलंबोमध्येही होऊ शकतो.
advertisement
पाकिस्तानची टीम सेमी फायनलला पोहोचली तर 4 मार्चला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर सामना होईल. पण पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचू शकली नाही आणि श्रीलंका क्वालिफाय झाली तर श्रीलंका भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही टीमविरुद्ध कोलंबोमध्ये खेळेल. आधीच्या वेळापत्रकानुसार श्रीलंका सेमी फायनलला पोहोचली असती तर त्यांना भारतामध्ये सेमी फायनल खेळायची होती, पण आता आयसीसीने शेवटच्या क्षणी यात बदल केला आहे.
advertisement
टीम इंडिया सेमी फायनलला क्वालिफाय झाली तर तर त्यांचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. पण हा सामना पाकिस्तानविरुद्ध असेल तर तो कोलंबोमध्ये खेळवला जाईल. पाकिस्तान किंवा श्रीलंका सेमी फायनलमध्ये पोहोचले नाहीत, तर पहिली सेमी फायनल कोलकात्याच्या इडन गार्डन्समध्ये खेळवली जाईल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच ICC ने शेड्यूल बदललं, आता कुठे होणार सेमी फायनल?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement