T20 वर्ल्ड कपच्या आधी आणखी एक ड्रामा, भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री अचानक का थांबली?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप भोवतीचा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये.
मुंबई : 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप भोवतीचा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. बांगलादेश क्रिकेट टीमने भारतामध्ये खेळायला नकार दिल्यानंतर आयसीसीनेही बांगलादेशला इशारा दिला. वर्ल्ड कपचे सामने भारतामध्येच खेळावे लागतील, असं आयसीसीकडून बांगलादेशला सांगण्यात आलं, त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा विचार करू शकते, असंही वृत्त समोर आलं.
बांगलादेश क्रिकेटचा वाद सुरू असतानाच आता भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्रीही अचानक थांबली आहे. भारत-पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यांची तिकीट विक्री सुरू होताच बुधवारी अधिकृत वेबसाइट बुक माय शो क्रॅश झाली. तिकीट विक्रीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच मागणी वाढली, त्यामुळे वेबसाइट क्रॅश झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला टी-20 सामना 15 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
advertisement
तिकीट विक्रीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर एकाच वेळी मोठ्या संख्येने चाहते बुक माय शो च्या वेबसाइटवर आले, त्यामुळे सर्व्हरवर दबाव आला आणि वेबसाइट क्रॅश झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तान श्रीलंकेमध्ये खेळणार
टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंकेमध्ये होत आहे. सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानने भारतात खेळायला नकार दिल्यानंतर त्यांचे सामने श्रीलंकेमध्ये खेळवले जाणार आहेत. तर दुसरीकडे भारत-बांगलादेश यांच्यातले संबंधही बिघडले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारामुळे बीसीसीआयने आयपीएलमधून मुस्तफिजूर रहमान या बांगलादेशी खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला, त्यानंतर बांगलादेशने भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळायला नकार दिला. पाकिस्तानप्रमाणे आमचे सामनेही श्रीलंकेत आयोजित करावेत, अशी मागणी बांगलादेशने केली, पण आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली आहे. आता बांगलादेश त्यांच्या या मागणीवर ठाम राहिलं, तर त्यांना वर्ल्ड कपला मुकावं लागू शकतं, अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशची जागा दुसरी टीम घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 11:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपच्या आधी आणखी एक ड्रामा, भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री अचानक का थांबली?










