advertisement

T20 World Cup : संध्याकाळी 6.10 वाजता ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास होणार! सगळ्यांची नजर घड्याळावर

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. 6 टीमचा सुपर-8 स्टेजमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज टीम पुढच्या राऊंडमध्ये जाणार का नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.

संध्याकाळी 6.10 वाजता ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास होणार! सगळ्यांची नजर घड्याळावर
संध्याकाळी 6.10 वाजता ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास होणार! सगळ्यांची नजर घड्याळावर
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. 6 टीमचा सुपर-8 स्टेजमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज टीम पुढच्या राऊंडमध्ये जाणार का नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्या सामन्याच्या निर्णयावर ऑस्ट्रेलिया सुपर-8 मध्ये क्वालिफाय होणार का नाही? याचा फैसला होणार आहे, पण या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. कोलंबोमध्ये पाऊस पडत असल्यामुळे 3 वाजता सुरू होणाऱ्या सामन्याचा टॉसही अजून झालेला नाही.
मॅचचा निकाल लागण्यासाठी निदान 5-5 ओव्हरची मॅच होणं गरजेचं आहे, त्यामुळे प्रत्येकी 5-5 ओव्हरचा सामना खेळवण्यासाठीचा कट ऑफ टाईम संध्याकाळी 6.10 आहे. संध्याकाळी 6.10 वाजेपर्यंत सामना सुरू झाला नाही, तर झिम्बाब्वे आणि आयर्लंडला प्रत्येकी 1-1 पॉईंट दिला जाईल. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाचं यंदाच्या वर्ल्ड कपमधलं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येणार आहे, तर झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये प्रवेश करेल.
advertisement
ग्रुप बी मधून 3 सामन्यात 3 विजय मिळवलेली श्रीलंका आधीच सुपर-8 मध्ये क्वालिफाय झाली आहे. तर झिम्बाब्वे 2 सामन्यात 2 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाला ग्रुप स्टेजमध्ये 3 पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे, त्यामुळे कांगारू तिसऱ्या क्रमांकावर आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडचा विजय झाला तर ऑस्ट्रेलियाला सुपर-8 मध्ये प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळेल, यासाठी ऑस्ट्रेलियाला ग्रुप स्टेजमधल्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात ओमानचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे.
advertisement
सुपर-8 स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिले झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यामुळे मोठा उलटफेर झाला, त्यानंतर सोमवारी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियालाही पराभवाची धूळ चारली, या दोन पराभवांमुळे ऑस्ट्रेलियाला जबर धक्का बसला आहे, ज्यामुळे त्यांच्यासमोर ग्रुप स्टेजलाच घरी जायचा धोका निर्माण झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : संध्याकाळी 6.10 वाजता ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास होणार! सगळ्यांची नजर घड्याळावर
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement