advertisement

भिवंडीत एकमेकांना सत्तेबाहेर ठेवण्याचे भाजप-शिंदेसेनेचं प्लॅनिंग, महापौर कुणाचा होणार? Inside Story

Last Updated:

भाजप चंद्रपूर पॅटर्न राबवण्याची तयारी करतीये. इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली पॅटर्ननुसार रणनीती आखली आहे.

भिवंडी महापालिका
भिवंडी महापालिका
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे: एखाद दुसरा अपवाद वगळता भिवंडी महानगरपालिकेचा आजवरचा इतिहास आहे की ज्या पक्षांची आघाडीची संख्या सर्वात कमी असते त्यांचा महापौर बसतो आणि ते ५ वर्ष राज्य करतात. यात कोणार्क विकास आघाडी नेहमी आघाडीवर असते. यानुसार आश्चर्याची गोष्ट म्हणजे महापौर पदाकरिता १० आणि उपमहापौर पदाकरिता ७ अर्ज दाखल झाले असून यापैकी बहुतांश अर्ज हे अपक्ष आणि आघाडीतील नगरसेवकांनी भरलेत. तर दुसरीकडे भिवंडीत भाजप चंद्रपूर पॅटर्न राबवण्याची तयारी करतीये. इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली पॅटर्ननुसार रणनीती आखली आहे.

भिवंडीत चंद्रपुर पॅटर्न की KDMC पॅटर्न?

भाजपाचा चंद्रपूर पॅटर्न राज्यात गाजला. काँग्रेसला गाफील ठेवून भारतीय जनता पक्षाने ठाकरे सेनेला सोबत घेऊन चंद्रपुरात आपला महापौर बसवला. भिवंडीत काँग्रेस ३० आणि भाजपा २२ मिळून ५२ जागा होतात आणि बहुमताचा आकडा ४६ आहे यानुसार अडीच अडीच वर्षे महापौर पद आणि इतर महत्वाची पदे दरवर्षी विभागून असा फॉर्म्युला भाजपा आणि काँग्रेसचा ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement

भिवंडीत KDMC पॅटर्न ?

शिवसेनेला महापौर बसवण्यासाठी भाजपला सत्तेबाहेर ठेवावे लागेल. यासाठी शिवसेना KDMC पॅटर्ननुसार रणनीती आखत आहे. यानुसार काँग्रेस ३०, शिवसेना १२ आणि कोणार्क विकास आघाडीला सोबत घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पण कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील हे सध्या एका फसवणुकीच्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. महापौर निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने ही अटकेची खेळी खेळल्याची चर्चा आहे.
advertisement

सेक्युलर फ्रंटकडून महापौरपदासाठी जुळवाजुळव

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि समाजवादी पार्टी असा सेक्युलर फ्रंट महापौरसाठी तयार झाला होता, पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांना आपला महापौर बसविण्यासाठीची समीकरणे जुळत नसल्याचे सांगितले जाते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भिवंडीत एकमेकांना सत्तेबाहेर ठेवण्याचे भाजप-शिंदेसेनेचं प्लॅनिंग, महापौर कुणाचा होणार? Inside Story
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement