Video : गली क्रिकेटसारखा कॅच सोडला, 4 बॉलनंतर जॉन्टीला लाजवलं, हा तर 'कॅच ऑफ द वर्ल्ड कप'!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो चा आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 20 ओव्हरमध्ये 181 रनवर ऑलआऊट झाला.
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो चा आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 20 ओव्हरमध्ये 181 रनवर ऑलआऊट झाला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाला 8.3 ओव्हरमध्येच 104 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली, पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग गडगडली. मिचेल मार्शने 27 बॉलमध्ये 54 तर ट्रॅविस हेडने 29 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली.
मार्श आणि हेडच्या अर्धशतकांनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 200 रनच्या पुढे जाईल, असं वाटत होतं, पण श्रीलंकेच्या बॉलरनी ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरला ब्रेक लावला. यामध्ये श्रीलंकेच्या फिल्डिंगनेही मोलाचं योगदान दिलं. 4 विकेट गेल्यानंतर इंग्लिस आणि मॅक्सवेल यांनी श्रीलंकेवर पुन्हा आक्रमण करायला सुरूवात केली, त्यातच पथुम निसंका याने दुष्मंता चमिराच्या बॉलिंगवर 16 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला धोकादायक मॅक्सवेलचा कॅच सोडला.
advertisement
பாயும் புலி Pathum Nissanka!
தொடர்ந்து காணுங்கள் | ICC Men’s #T20WorldCup |#AUSvSL| JioHotstar & Star Sports 1 தமிழில்#StarSportsTamil pic.twitter.com/mazKQRf6kb
— Star Sports Tamil (@StarSportsTamil) February 16, 2026
मॅक्सवेलचा हा कॅच श्रीलंकेला महागात पडणार असं वाटत होतं, पण 4 बॉलनंतर 17 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला पथुम निसंकानेच मॅक्सवेलचा अशक्य असा कॅच घेतला. मॅक्सवेलने दुशन हेमंताच्या बॉलवर रिव्हर्स स्वीप मारली, तेव्हा बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असणाऱ्या निसंकाने उडी कॅच घेतला. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधल्या सर्वोत्तम कॅचमध्ये या कॅचची गणना होत आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेने पराभवाचा धक्का दिला आहे, त्यामुळे सुपर-8 ला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला कुठल्याही परिस्थितीमध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकवा लागणार आहे. ग्रुप बी मध्ये सध्या श्रीलंका 2 सामन्यात 2 विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर झिम्बाब्वेनेही 2 सामन्यात 2 विजय मिळवले आहेत, त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ऑस्ट्रेलिया 2 सामन्यांमध्ये 1 विजय आणि एका पराभवासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 8:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Video : गली क्रिकेटसारखा कॅच सोडला, 4 बॉलनंतर जॉन्टीला लाजवलं, हा तर 'कॅच ऑफ द वर्ल्ड कप'!








