Amol Muzumdar : 'राजाला भेटू दिलं नाही, तेव्हाच ठरवलं...', अमोल मुझुमदारच्या मनातलं बाहेर आलं, PM मोदीही ऐकत राहिले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अमोल मुझुमदारला त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता त्याच्या नावापुढे वर्ल्ड कप जोडला गेला आहे.
नवी दिल्ली : अमोल मुझुमदारला त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता त्याच्या नावापुढे वर्ल्ड कप जोडला गेला आहे. अमोल मुझुमदार 2025 महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक होता. वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर अमोल मुझुमदारने त्याच्यासोबत यावर्षी जून महिन्यात घडलेला हृदयस्पर्शी किस्सा सांगितला. 7,400 कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या राजाला भेटू न दिल्याबद्दल अमोल मुझुमदारने पंतप्रधान मोदींना सांगितलं.
इंग्लंडमध्ये किंग चार्ल्सची भेट मिळाली नाही
यावर्षी जून महिन्यात भारतीय महिला टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली होती, तेव्हा 7,408 कोटी रुपयांचा मालक किंग चार्ल्सला भेटण्याचा कार्यक्रम ठरला होता, पण प्रोटोकॉलनुसाकर फक्त 20 जणांनाच राजाला भेटायची परवानगी होती, त्यामुळे टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ किंग चार्ल्सना भेटू शकला नाही, असं अमोल मुझुमदारने पंतप्रधान मोदींना सांगितलं.
advertisement
...तेव्हा वाईट वाटलं
'सपोर्ट स्टाफला किंग चार्ल्सला भेटता न आल्याबद्दल मला वाईट वाटलं, तेव्हाच ठरवलं की आज फोटो काढता आला नाही, पण 4 किंवा 5 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढू, असं ठरवलं होतं. तो दिवस होता आणि आज आम्ही सगळे तुमच्यासमोर आहोत', असं अमोल मुझुमदार म्हणाला.
पंतप्रधान भेटीवर काय म्हणाला अमोल?
advertisement
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अमोल मुझुमदारने एएनआयलाला विशेष मुलाखत दिली. 'पंतप्रधानांना भेटणं हा अद्भुत अनुभव होता. त्यांनी आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसह आम्ही सर्व 37 जण तिथे उपस्थित होतो. आम्ही सर्वांनी तो क्षण एन्जॉय केला', अशी प्रतिक्रिया अमोल मुझुमदारने दिली.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
November 06, 2025 2:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Amol Muzumdar : 'राजाला भेटू दिलं नाही, तेव्हाच ठरवलं...', अमोल मुझुमदारच्या मनातलं बाहेर आलं, PM मोदीही ऐकत राहिले!


