VIDEO : 'गब्बर'चे रडून रडून हाल,मुलाशीही भेटता येईना, घटस्फोटानंतर धवनची झाली वाईट अवस्था

Last Updated:

टीम इंडियात खेळताना त्याचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्याची पर्सनल लाईफ प्रचंड चर्चेत होती. आता याच घटस्फोटावर धवनने पुन्हा एकदा भाष्य केले आहे. यावेळी तो इमोशनल देखील झाला होता.

shikhar dhawan divorce
shikhar dhawan divorce
Shikhar Dhawan Divorce Ayesha Mukherji : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गब्बर शिखर धवनने गेल्याच वर्षी क्रिकेट वर्तुळात निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर तो क्रिकेटपासुन काहीसा दुर झाला होता. पण सोशल मीडियावर तो अॅक्टीव्ह असायचा. आता यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची इवेंट अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे. त्यात टीम इंडियात खेळताना त्याचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्याची पर्सनल लाईफ प्रचंड चर्चेत होती. आता याच घटस्फोटावर धवनने पुन्हा एकदा भाष्य केले आहे. यावेळी तो इमोशनल देखील झाला होता.
शिखर धवनची मुलाखत ही ब्रुटने घेतली आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला आहे. या
मुलाखतीत धवनने घटस्फोटानंतर तो आपल्या मुलापासुन कसा दुर झाला? हे त्याने सांगितले आहे. माझा मुलगा आता 11 वर्षांचा आहे.पण मी त्याला फक्त अडीच वर्षे पाहिले.त्याला भेटून दोन वर्षे झाली आहेत आणि त्याच्याशी बोलून एक वर्ष झालं आहे. दरम्यानच्या काळात मला सगळीकडून ब्लॉक करण्यात आलं होतं. तो काळ खूप कठीण होता.पण नंतर या सर्व गोष्टींसोबत जगण्याची सवय लावावी लागली असे धवन मुलाखतीत सांगतो.
advertisement
घटस्फोटानंतर धवन बराच काळ अस्वस्थ होता. तो आतून प्रचंड तुटला होता. धवन पुढे म्हणतो,मी त्याच्याशी आध्यात्मिकरित्या बोलतो.मी जेव्हा माझ्या मुलाशी रोज बोलतो तेव्हा मला हेच जाणवते,मी त्याला मिठी मारतोय.मी माझी ऊर्जा आध्यात्मिकरित्या त्याच्याकडे हस्तांतरित करतो.
advertisement
दरम्यान धवनने ऑक्टोबर 2012 मध्ये आयेशा मुखर्जीशी लग्न केले. आयेशाचे हे दुसरे लग्न होते. त्याच्या पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी होती.धवनने मुलीला दत्तक घेतले होते.पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. आयशा धवनपेक्षा सुमारे १० वर्षांनी मोठी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धवन आणि आयशा 2020 पासून वेगळे राहत होते. यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. धवनला एक मुलगाही आहे. त्याचे नाव जोरावर आहे आणि तो आयशासोबत राहतो.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 'गब्बर'चे रडून रडून हाल,मुलाशीही भेटता येईना, घटस्फोटानंतर धवनची झाली वाईट अवस्था
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement