IND-A vs SA-A : मुंबईच्या एकट्या खेळाडूने आफ्रिकेला रडवलं, गोलंदाजीत 8 विकेट, नंतर मॅच विनिंग खेळी, भारताचा दणदणीत विजय
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने शानदार विजय नोंदवला. बेंगळुरू येथे झालेल्या पहिल्या अनधिकृत सामन्याच्या शेवटच्या दिवशी, यजमान संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा तीन विकेट्सने पराभव करून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
India A vs South Africa A, 1st unofficial Test Match : सध्या टीम इंडिया वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सामने खेळत आहे. एकीकडे महिलांचा आज दक्षिण आफ्रिकासोबत फायनलचा सामना रंगणार आहे, तर दुसरीकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना रंगला आहे. अशातच आता ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने शानदार विजय नोंदवला. बेंगळुरू येथे झालेल्या पहिल्या अनधिकृत सामन्याच्या शेवटच्या दिवशी, यजमान संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा तीन विकेट्सने पराभव करून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार ऋषभ पंतने 90 धावांची शानदार खेळी केली. अष्टपैलू तनुष कोटियन आणि अंशुल कंबोज यांनीही फलंदाजी आणि चेंडूने संघाच्या विजयात योगदान दिले.
इंडिया अ संघाने मालिकेत आघाडी घेतली
275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ऋषभ पंत बाद झाल्यानंतर भारत अ संघासमोर सामन्याच्या शेवटच्या दिवशी पराभवाचा धोका निर्माण झाला . यजमान संघाचे 7 विकेट 215 धावांवर बाद झाले होते. त्यानंतर अंशुल कंबोज आणि मानव सुथार यांनी 7 व्या विकेटसाठी नाबाद 62 धावांची भागीदारी करून दमदार विजय मिळवला. अंशुल कंबोजने 46 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 37 धावा केल्या. मानव सुथारने 53 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या.
advertisement
तनुष कोटियनने 30 चेंडूत 2 चौकारांसह 23 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतनेही 113 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांसह 90 धावा करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. आयुष बदोनी 34 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून तियान व्हॅन वुरेनने 3 आणि त्शेपो मोरेकीने 2 बळी घेतले. या सामन्यात तनुष कोटियनने शानदार कामगिरी केली.
advertisement
तनुश कोटियनने दाखवली त्याची ताकद
view commentsया सामन्यात तनुश कोटियनने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले . या सामन्यात त्याने एकूण 8 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 13 आणि दुसऱ्या डावात 23 धावा केल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. अंशुल कंबोजने दोन्ही डावात 4 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका अ संघाने 309 धावा केल्या. प्रत्युत्तरात, यजमान संघ फक्त 234 धावांवर गारद झाला. दुसऱ्या डावात, पाहुण्या संघ फक्त 199 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे, भारत अ संघासमोर विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी 7 गडी गमावून पूर्ण केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND-A vs SA-A : मुंबईच्या एकट्या खेळाडूने आफ्रिकेला रडवलं, गोलंदाजीत 8 विकेट, नंतर मॅच विनिंग खेळी, भारताचा दणदणीत विजय


