IND vs AUS : हरमनप्रीतच्या महिला ब्रिगेडचा 'खेळ खल्लास'? टीम इंडियासाठी कसं असेल सेमीफायनलचं गणित?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Team India Semifinal Scenario : आज भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध सामना खेळवला जाईल. मात्र, टीम इंडियाने सामना जिंकला तरी देखील सेमीफायनलचा रस्ता स्पष्ट नसेल. टीम इंडियासाठी कसं असेल सेमीफायनलचं गणित? जाणून घ्या.
IND W vs AUS W : कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ आज T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात चिवड अशा ऑस्ट्रेलिया संघाशी भिडणार आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये टीम इंडियाला कोणत्याही संघाकडून सर्वात मोठा धोका असेल तर तो ऑस्ट्रेलियाचा... ऑस्ट्रेलिया नेहमीच टीम इंडियावर भारी ठरलीये. अनेकदा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीस देखील मिळवलंय. त्यामुळे आता हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलियाचं नाक ठेचण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. परंतू टीम इंडियासाठी सेमीफायनलचा रस्ता साधासोपा असणार नाही.
टीम इंडिया सध्या अ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभव स्विकारला आहे. त्यामुळे 0.576 रन रेटसह टीम इंडियाकडे 4 गुण आहेत. अशातच आता टीम इंडियासमोर कडवं आव्हान असेल ते ऑस्ट्रेलियाचं... टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर सेमीफायनलचा रस्ता अधिक सुखद असेल.
टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचेल?
advertisement
जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 1 धावाने पराभव केला तर न्यूझीलंडला काही करून पाकिस्तानला 18 धावांनी किंवा 16 चेंडू राखून पराभूत करावं लागेल. असं झाल्यास टीम इंडियासाठी आगामी मार्ग सोपा होईल.
त्याचबरोबर जर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून 18 पेक्षा कमी धावांनी पराभूत झाला तर पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवलं तरी देखील टीम इंडिया पात्र ठरू शकते. परंतू पाकिस्तानला हा सामना कमीतकमी 58 धावांनी जिंकावा लागेल.
advertisement
आणखी वाचा - IPL 2025 ऑक्शनपूर्वी Mumbai Indians चा मोठा निर्णय, ट्रॉफी जिंकून देणाऱ्या 'या' दिग्ग्जाची घरवापसी
दरम्यान, 2008 पासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 34 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 25 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियाने केवळ 7 सामने जिंकले आहेत. तर सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर सेमीफायनल गाठणं सर्वात सोपं काम असेल.
advertisement
वूमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सज्ञान पाटील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2024 5:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : हरमनप्रीतच्या महिला ब्रिगेडचा 'खेळ खल्लास'? टीम इंडियासाठी कसं असेल सेमीफायनलचं गणित?